Marathi Movies of 2024 List : २०२४ मध्ये सेलिब्रिटींनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. या वर्षात अनेक हिट चित्रपट झाले. यात अनेक मोठे कलाकार पाहायला मिळाले. प्रेक्षकांना रोमान्स, कॉमेडी आणि ॲक्शनची मेजवानी पाहायला मिळाली. मात्र, आता हे वर्ष संपायला अवघे दोन आठवडे राहिले आहेत. बॉलिवूड प्रमाणेच मराठी सिनेसृष्टीने सुद्धा बरेच दमदार आणि ह्रिदयस्पर्शी सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांच्या वाटेला दिले. यावर्षी तब्बल ५० हुन अधिक चित्रपट आतापर्यंत प्रदर्शित झाले आहेत. त्यात नवरा माझा नवसाचा २, धर्मवीर २, ओले आले, शिवबाचा छावा, अल्याड पल्याड, सत्यशोधक, अलीबाबा आणि चाळिशीतले चोर, खुर्ची, सापळा, मुसाफिरा, सूर लागू दे, श्रीदेवी प्रसन्न अशा अनेक चित्रपटांची नावं आहेत. मात्र, काही असे ठराविक सिनेमे आहेत जे प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले. आज आपण अश्याच चित्रपटांवर एक नजर टाकणार आहोत… नवरा माझा नवसाचा २ : नवरा माझा नवसाचा २ हा २०२४ चा सचिन पिळगांवकर दिग्दर्शित आणि निर्मित कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे. २००४ मध्ये आलेल्या नवरा माझा नवसाचा चित्रपटाचा सिक्वेल असून, यात सचिन पिळगांवकर, अशोक सराफ आणि सुप्रिया पिळगांवकर यांची भूमिका आहे. तसेच हेमल इंगळे आणि स्वप्नील जोशी देखील आहेत. धर्मवीर २: साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट : हा चित्रपट २०२४ मधील एक मराठी चित्रपट असून. २०२२ मधील ‘धर्मवीर’चा दुसरा भाग आहे. ‘धर्मवीर २’ हा सिनेमा यंदा मराठीसह हिंदीत देखील ९ ऑगस्ट २०२४ रोजी संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. जुनं फर्निचर : महेश मांजरेकर, भूषण प्रधान यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट एका वडिलांची आपल्याच मुलाविरुद्धची लढाई दाखवतो. हा चित्रपट देखील प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे. घरत गणपती : भूषण प्रधान आणि निकिता दत्ता यांचा ‘घरत गणपती’ हा चित्रपट २६ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. भारतीय नातेसंबंधांची गोष्ट सांगत सणांचं महत्व पाठवूक देणारा हा चित्रपट आहे. चित्रपट प्राइम व्हिडिओ वर उपलब्ध आहे. स्वरगंधर्व सुधीर फडके : लोकप्रिय गायक सुधीर फडके यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट १६ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. सुनील बर्वे यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. नाच गं घुमा : लोकप्रिय मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांचा ‘नाच गं घुमा’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. फुलवंती : प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांचा ‘फुलवंती’ हा चित्रपट देखील या वर्षीच्या उत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक पर्वणी आहे.