ॲास्ट्रेलियातील मराठीबाणा.! कराडच्या मराठमोळ्या तरुणाचा व्यवसाय पाहून प्रवीण तरडे म्हणतात…

Updated On:

मुंबई – देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, ट्रिपल सीट आणि धर्मवीर असे अनेक सुपरहिट चित्रपट मराठी कलाविश्वाला देणारे अभिनेते, लेखक व दिग्दर्शक ‘प्रविण विठ्ठल तरडे’ यांनी वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. त्यामुळेच मराठी चित्रपटसृष्टीत प्रवीण तरडे यांच्या प्राविण्यांचे वेळोवेळी कौतुकही झाले आहे. प्रवीण तरडे आपल्या चित्रपटातून नेहमीच समाजातील वास्तविक घटनांना रुपेरी पडद्यावर जिवंत करतात.

मात्र, सध्या प्रवीण तरडे पत्नी स्नेहल तरडेबरोबर ऑस्ट्रेलियामध्ये सुट्ट्या एण्जॉय करत असून, ते यावेळी ऑस्ट्रेलियामधील विविध शहरांमध्ये भटकंती करत असल्याचं दिसून येत आहे. या दरम्यानचे व्हिडीओ ते सोशल मीडियावर शेअर करत असून, त्याबद्दलची माहिती देखील ते सांगत आहेत.

असाच एक व्हिडिओ त्यांनी आपल्या फेसबुकवर शेअर केला असून, सध्या हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. अनेकांनी प्रवीण यांच्या या व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. मराठी तरुण मुलाने ऑस्ट्रेलियांमध्ये जाऊन त्याचा स्वतःचा व्यवसाय कसा सुरू केला. याचबाबत हा व्हिडिओ आहे.

प्रवीण तरडे यांनी फेसबुक पोस्ट…!

‘ॲास्ट्रेलियातील मराठीबाणा..!! 65 किलो घरी बनवलेले फरसाण घेउन कराडचा योगेश चव्हाण हा मराठी तरूण ॲास्ट्रेलियात आला आणि आज ईथे वर्षाला 70 हजार किलोचा माल तो विकतोय.. आता महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून त्याला उद्योजक तयार करायचेत..’

आणखी संबंधित बातम्या

Marathi language rule : महाराष्ट्रात मराठी बोलावचं लागणार! रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आजपासून नियम लागू

2026-08-20 08:26:50

Marathi language rule : महाराष्ट्रात मराठी बोलावचं लागणार! रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आजपासून नियम लागू

Mulshi Pattern 2: 'मुळशी पॅटर्न २' च्या नावाला मुळशीकरांचा विरोध! कथानकाला नाही, पण 'या' कारणासाठी आक्षेप

2026-08-14 04:30:54

Mulshi Pattern 2: 'मुळशी पॅटर्न २' च्या नावाला मुळशीकरांचा विरोध! कथानकाला नाही, पण 'या' कारणासाठी आक्षेप

Marathi Compulsory Auto-Taxi Driver: मराठी शिकावचं लागणार, अन्यथा चालकांचा परवाना होणार रद्द, शासन निर्णय येणार

2026-08-12 13:05:36

Marathi Compulsory Auto-Taxi Driver: मराठी शिकावचं लागणार, अन्यथा चालकांचा परवाना होणार रद्द, शासन निर्णय येणार

Pratap Sarnaik : "एक लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले मराठीचे धडे" - प्रताप सरनाईक

2026-08-06 22:34:52

Pratap Sarnaik : "एक लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले मराठीचे धडे" - प्रताप सरनाईक

Pravin Tarde : अभिनेता प्रवीण तरडे यांचा मोठा निर्णय; 'देऊळ बंद 2' आता चित्रपटगृहांत पाहता येणार नाही

2026-08-06 17:25:41

Pravin Tarde : अभिनेता प्रवीण तरडे यांचा मोठा निर्णय; 'देऊळ बंद 2' आता चित्रपटगृहांत पाहता येणार नाही