राज्यातील सर्व शाळांमध्ये आता मराठी अनिवार्य; टाळाटाळ करता येणार नाही, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Marathi Language Compulsory In School | राज्यातील सर्व शाळांमध्ये आता मराठी हा विषय अनिवार्य करण्यात आला आहे. नव्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात मराठी हा विषय पर्यायी केल्याची चर्चा असताना आता शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. अनेक इंग्रजी माध्यमांच्या तसेच विविध बोर्डाच्या शाळांकडून मराठी भाषा शिकवण्यास टाळाटाळ केली जात होती. मात्र आता महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणं बंधनकारक असणार आहे.
शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शालेय शिक्षण विभागाबद्दल काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यात त्यांनी शिक्षण विभागाची पुढील वाटचालींबाबत चर्चा करत असल्याचे सांगितले. तसेच शालेय शिक्षण विभागाचा रोडमॅप लवकरच तयार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. Marathi Language Compulsory In School |
सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणे सक्तीचे
“इंग्रजी भाषा आवश्यक असली, तरी राज्यात मराठीचे महत्त्व सर्वांत जास्त आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जाही मिळाला आहे. इंग्रजी शाळांमध्ये मराठी शिकवणे बंधनकारक असतानाही अनेक ठिकाणी तसे होत नसल्याच्या तक्रारी आहेत. यातून त्यांना कोणतीही पळवाट काढता येणार नाही. याबरोबरच मराठी भाषेच्या अध्यापनाला अधिकाधिक व्यापक करण्यासाठी त्या शाळेतील शिक्षकांनाही मराठी भाषेचे ज्ञान असले पाहिजे. आता राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणे सक्तीचा कायदा करण्यात आला आहे. यामुळे खासगी, सीबीएससी, आयसीएससी किंवा कोणत्याही इंग्रजी बोर्डाच्या शाळांना हा नियम लागू असणार आहे,” असेही ते म्हणाले.
पालकांना करता येणार तक्रार
तसेच “मराठी भाषेचे अध्यापन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या इंग्रजी शाळांवर शालेय शिक्षण विभागाची करडी नजर असणार आहे. ज्या शाळा मराठी भाषा शिकवण्यास टाळाटाळ करत असतील, त्याची तक्रार पालकांना करता येणार आहे. तसेच या अशा शाळांवर योग्य ती कारवाई केली जाणार आहे”, असेही दादा भुसे म्हणाले. Marathi Language Compulsory In School |
दादा भुसे यांनी शालेय शिक्षण मंत्री म्हणून पदाभार स्वीकारल्यानंतर शालेय शिक्षण विकासाचा एक दशसूत्री कार्यक्रम जाहीर करून तो राबवला जाईल, अशीही माहिती दिली आहे. Marathi Language Compulsory In School |
हेही वाचा:





