अक्षय कुमारसोबत झळकणार मराठमोळी अभिनेत्री

Akshay Kumar | बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचे मागील काही चित्रपट सातत्याने अपयशी ठरत आहे. याचदरम्यान, आता अक्षयने त्याच्या ‘हैवान’ या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. नुकतेच त्याने आगामी थ्रिलर चित्रपटाचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना माहिती दिली. विशेष म्हणजे या चित्रपटात त्याच्यासोबत मराठमोळी अभिनेत्री झळकणार आहे.
अभिनेते, दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांची लेक अभिनेत्री श्रिया पिळगावकर या चित्रपटामध्ये दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. श्रेया ‘हैवान’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याची माहिती आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र या चित्रपटात श्रियाच्या अभिनयाचे विविध पैलू प्रेक्षकांना पाहायला मिळतील अशी शक्यता आहे. ही माहिती समोर येताच श्रियाच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. Akshay Kumar |
View this post on Instagram
‘हैवान’ या चित्रपटात अक्षय कुमारसोबत अभिनेता सैफ अली खानदेखील आहे. अक्षय व सैफ १८ वर्षांनी या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करणार आहेत. ते दोघे शेवटचे ‘टशन’ या २००८ साली आलेल्या चित्रपटात झळकले होते. आता श्रिया पहिल्यांदाच अक्षय कुमार व सैफ अली खान यांच्यासह काम करणार आहे. Akshay Kumar |
‘हैवान’ हा चित्रपट या मल्याळी चित्रपटाचा रिमेक आहे. नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले असल्याचे अक्षय कुमारने सोशल मीडियाद्वारे सांगितले होते. Akshay Kumar |
श्रियाने २०१६ साली आलेल्या ‘फॅन’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने ‘मिर्झापूर’, ‘गिल्टी माईंड्स’, ‘द ब्रोकन न्यूज’ व ‘ताजा खबर’ यांसाख्या वेब सीरिजमध्ये काम केले आहे. अलीकडेच ती ‘मंडला’ मर्डर्स या तिच्या वेब सीरिजमध्ये दिसली. यातील तिच्या भूमिकेचे अनेकांनी कौतुक केले. Akshay Kumar |
हेही वाचा :





