सेक्स वर्करची भूमिका करत आहे, श्रिया पिळगावकरने दिली ‘ताजा खबर’

गिल्टी माइंड्स आणि द ब्रोकन न्यूजच्या यशामुळे श्रिया पिळगावकर वेब सिरीज इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असलेला चेहरा बनली आहे. श्रिया पिळगावकर ही इंडस्ट्रीतील सर्वात अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या करिअरचा आलेख उंचावत असताना श्रिया नवीन काय घेऊन येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. श्रिया आता डिजनी हॉटस्टारवरील ताजा खबरमध्ये दिसणार आहे.
या मालिकेत भुवन बाम, जेडी चक्रकरी, देवेन भोजानी, प्रथमेश परब, नित्या माथूर आणि शिल्पा शुक्ला यांच्याही भूमिका आहेत. आगामी मालिकेत श्रिया एका हटके भूमिकेत दिसणार आहे. कॉमेडी-ड्रामामध्ये श्रिया आता कोणती व्यक्तिरेखा साकारणार याची उत्सुकता चाहत्यांना लागलेली आहे.
शूटिंग पूर्ण झाल्यानंतर श्रिया पिळगावकर म्हणते, “ताजा खबरसाठी शूटिंग करणे हा खूप मजेदार अनुभव होता. मला कॉमेडी-नाटक आवडते आणि हा एक प्रकार आहे जो मी आतापर्यंत केलेला नाही. मी सेक्स वर्करची भूमिका करत आहे. माझे पात्र आणि लूक पूर्णपणे भिन्न आहे. मला भुवन आणि या संपूर्ण क्रूसोबत काम करायला आवडले. प्रेक्षक याला कसा प्रतिसाद देतात हे पाहण्यासाठी मी थांबू शकत नाही असं देखील श्रिया यावेळी म्हणाली.
श्रिया पिळगावकर मिर्झापूरमधील तिच्या हटके अंदाजामुळे अनेकांच्या लक्षात राहिली. त्यामुळेच तिला अनेक मोठं मोठ्या सिरीज करण्याची संधी मिळाली. आगामी काळात देखील श्रिया अनेक मोठं मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये झळकणार आहे. ती क्रॅकडाउन सीझन २, द गॉन गेम सीझन २ आणि इश्क-ए-नादान अशा बिग बॅनर्सच्या चित्रपटात देखील दिसणार आहे.

