नेवासा फाटा येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत

नेवासा – मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी राज्य सरकारने मान्य केल्यानंतर संघर्ष योद्धा मनोज जरांगे – पाटील यांचे फटक्यांच्या आतिषबाजीत व गुललाची उधळण करत अहमदनगर – छञपती संभाजीनगर महामार्गावरील नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात जंगी स्वागत करण्यात आले.
आरक्षणाची मागणी मान्य झाल्यानंतर अंतरवाली सराटीच्या दिशेने निघालेला गाड्यांचा ताफा नेवासा फाटा येथे दाखल होताच नेवासा पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर जोजार व मुकिंदपूरचे माजी सरपंच सतिश निपुंगे यांच्या नेत्तृत्वाखाली मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे – पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी नेवासा फाटा येथे मोठा जनसमुदाय उपस्थित होता संघर्ष योद्धा जरांगे – पाटील यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य करत तसा अध्यादेश त्यांच्या हाती शनिवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुपुर्द केला.
या अभूतपूर्व यशाचे जल्लोषानंतर परतीच्या प्रवासादरम्यान नेवासा फाटा या ठिकाणी मनोज जरांगे – पाटील यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत आले मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यामुळे समाजात यावेळी मोठे नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाल्याचे या स्वागतावेळी दिसून आले.





