मोठी बातमी.! मनोज जरांगेंचं आंदोलन सुरूच राहणार; मुदत संपली, लगेच मुदतवाढ मिळाली, नेमकं काय घडलं, पाहा….

Maratha Reservation : राज्यात पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या प्रमुख मागणीसाठी मराठा समाजाचे प्रणेते मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. आझाद मैदानावरून सकाळी १० वाजल्यापासून उपोषणाला सुरूवात झाली आहे. जरागेंना आठ तासांचा अवधी आंदोलनस्थळी देण्यात आला आहे.
मात्र, जरागेंनी यांनी आंदोलनस्थळावरून बोलताना आता मागे हटणार नसल्याचा निर्धार केला आहे. हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलन मुंबईत दाखल झाले आहेत. यामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत.
तसेच आझाद मैदानावर मराठा आंदोलक बांधवांची तोबा गर्दी झाली आहे. आंदोलनास पोलिसांनी दिलेली परवानगी संपली असून आता उद्यासाठी त्यांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मराठा आंदोलकांकडून आज दिवसभर झालेला घटनाक्रम पाहता आणखी काही कडक नियम व अटी पोलिसांकडून लावण्यात आले आहेत.
त्यातच, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या परवानगीबाबत मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी चर्चा करुन 1 दिवसाच्या मुदतवाढीचा निर्णय घेतला. त्यामुळे उद्या देखील हे आंदोलन असच सुरु राहणार आहे.
उद्याच्या आंदोलनासाठी परवानगी मिळावी यासाठी आझाद मैदान पोलिसांकडे जरांगे पाटील यांच्याकडून अर्ज करण्यात आला होता. दरम्यान, मनोज जरांगेंच्या आंदोलनास मुदतवाढीची परवानगी दिली असून आजचा प्रकार पाहता काही नियम व अटी त्यात असणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे.





