Vinod Patil : मराठा आरक्षण आंदोलन संपलं! पण विनोद पाटील म्हणतात: ‘यातून नवीन काहीच मिळालं नाही’ कारण…

Vinod Patil : गेल्या पाच दिवसांपासून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठीच्या आंदोलनाला काल २ सप्टेंबर रोजी पूर्णविराम मिळाला. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून प्रवर्गातून आरक्षण मिळावे. तसेच हैदराबाद गॅझिटिअर आणि सातारा संस्थानचे गॅझेटिअर लागू करावे या आणि इतर काही मागण्या सरकारने मान्य केल्या कराव्यात अशी भूमिका जरांगेंनी घेतली होती.
सरकारने हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याची जरांगेंची मागणी मान्य केली आहे. मात्र, मराठा हे कुणबीच आहेत यासाठी सरकारने दोन महिन्यांचा अवधी दिला आहे. त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असं सरकारच्या वतीने सांगण्यात आलं आहे. याशिवाय सातारा संस्थांच्या गॅझेटिअरसाठीही एका महिन्याची मुदत दिली आहे.
शासनाने घेतलेल्या हैदराबाद गॅझेटिअर निर्णयामुळे मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे गावकी, भावकी आणि कुळातील नोंदी असलेल्या मराठ्यांना OBC चे लाभ मिळणार आहेत. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि समितीमधील इतर सदस्यांनी मनोज जरांगे यांची काल २ सप्टेंबर रोजी आझाद मैदानावर जाऊन भेट घेतली. त्यानंतर जरांगे यांनी मराठा आरक्षणावर घेण्यात आलेल्या निर्णयाची पत्र समाजबांधवांपुढे वाचून दाखवली.
यातून काहीही नवीन मिळालं नाही
आता यानंतर मराठा आरक्षण याचिका करते आणि आंदोलक विनोद पाटील यांनी सरकारने घेतलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या जीआरचा टाचणी एवढाही फायदा आणि उपयोग होणार नसून समाजाला यातून काहीही नवीन मिळालं नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढे येऊन या जीआरचा अर्थ समजून सांगितला पाहिजे, असंही विनोद पाटील म्हणाले आहेत. तसेच त्यांनी 100 पैकी या जीआरला मायनस झिरो मार्क्स देईल, असं देखील म्हटलं आहे. त्यांनी एका वाहिनीशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे.
…याचे उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं नाही.
मराठा आरक्षण माणगीसाठी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन पुकारलं होतं. त्यांनी थेट मुंबई गाठण्याचं ठरवलं होतं. पण नवी मुंबईच्या वेशीवर त्यांनी आंदोलन केलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात निर्णय घेतला. नवी मुंबईच्या वेशीवर गुलाल उधाळला. आता यावरून विनोद पाटील यांनी मागच्या वेळेस गुलाल एकनाथ शिंदे यांनी खेळला, याचे उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं नाही. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुलाल खेळला याचे उत्तर त्यांनी द्यावे, असं आव्हान विनोद पाटील यांनी दिलं आहे.
जरांगेंच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्यात
हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीसाठी शासन निर्णय – मान्य
आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत – मान्य
आंदोलनातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी – मान्य
मराठा आंदोलकांवरील केसेस मागे – मान्य
प्रलंबित जात पडताळणीला मान्यता – मान्य
आंदोलकांवरील गुन्हे घेण्यास मान्यता – मान्य
कोणत्या आहेत प्रलंबित मागण्या?
सातारा गॅझेट अंमलबजावणीसाठी- १ महिन्याची मुदत
सातारा गॅझेट अंमलबजावणी १ महिन्याची मुदत
मराठा कुणबी एकच शासन निर्णय २ महिन्यांची मुदत
हेही वाचा : Pune District : राजगुरुनगरच्या प्रभाग रचनेवर 51 हरकती





