Maratha Reservation : आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक; लातूर बंदचे दिले आवाहन

Maratha Reservation – मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ व मराठा समाजास ओबीसीतून तातडीने आरक्षण द्यावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवार, दि. २३ सप्टेंबर रोजी लातूर जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
या बंदसाठी समाजबांधवांनी उत्सफूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मराठा आरक्षणासाठी समाज सातत्याने संघर्ष करीत आहे. आरक्षणाअभावी होत असलेली समाजाची परवड दिसत असताना सरकार व विरोधक हा प्रश्न गांभिर्याने न घेता त्याचे सातत्याने राजकारण करीत आहेत.
मात्र, सर्वांगिण प्रगतीसाठी मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण मिळणे हाच एकमेव पर्याय आहे. तरिही शासन हा विषय मार्गी लावण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. तसेच जरांगे यांच्या समर्थनार्थ आरक्षणासाठी हा बंद असल्याचे समाज बांधवांच्या वतीने सांगण्यात आले.





