#video : मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीला सुरवात; छत्रपती संभाजीराजे यांची उपस्थिती

Updated On:

पुणे –  १०२ घटना दुरुस्ती नंतर मराठा आरक्षण लढा नक्की कसा असावा याविषयी तज्ञांशी चर्चा कऱण्यासाठी राज्यस्तरीय बैठकीला पुण्यात सुरवात झाली आहे. 

या बैठकीला खासदार संभाजीराजे यांची प्रमुख उपस्थिती असून या बैठकीत राज्य समनव्यक राजेंद्र कोंढरे, राजेंद्र कुंजीर, धनंजय जाधव, सचिन आडेकर, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन फोलाने, रघुनाथ चित्रे पाटील, 

गणेश मापारी, हनुमंत मोटे, बाळासाहेब आमराळे, युवराज दिसले, प्राची दुधाने, सारिका जगताप, पूजा झोळे, अमर पवार यांसह पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, येथूनही राज्य समन्वयक उपस्थित आहेत.

प्रामुख्याने मराठा आरक्षण रद्द झाले नंतर महाराष्ट्र सरकारने छत्रपती संभाजीराजे यांना महिन्यात इतर मागण्या सोडवू असे सांगितले होते परंतु मागण्या सोडविल्या नाहीत तर,

आज दोन महिने होत आले फक्त आश्वासनामुळे मराठा समाज नाराज असल्याने असंतोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पुढील आंदोलनाचा मार्ग या बैठकीत ठरणार आहे.

पुण्यातील बैठकीत आजवरचा पूर्ण लेखाजोखा उपस्थितांच्या हातामध्ये देण्यात येणार आहे. मागण्या व सध्या ची स्थिती युती सरकार व महाआघाडी यांनी राबवलेली व दिलेली आश्वासने पुर्ण विडीओ तयार करून मांडली जाणार आहेत.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी महत्त्वाचे असणारे १०२ घटना दुरुस्ती विधेयक केंद्र सरकार मार्फत आज लोकसभेत येणार आहे.

आणखी संबंधित बातम्या

Auto Rickshaw Strike : कामानिमित्त बाहेर पडताना होऊ शकते गैरसोय; आज रिक्षा संघटनांची राज्यव्यापी बंदची हाक

2026-11-23 10:54:33

Auto Rickshaw Strike : कामानिमित्त बाहेर पडताना होऊ शकते गैरसोय; आज रिक्षा संघटनांची राज्यव्यापी बंदची हाक

Maharashtra Electricity : देशभरात विजेच्‍या मागणीत वाढ; महाराष्ट्रातही वीज पुरवठ्याचे आव्हान

2026-11-22 22:48:36

Maharashtra Electricity : देशभरात विजेच्‍या मागणीत वाढ; महाराष्ट्रातही वीज पुरवठ्याचे आव्हान

Solapur : सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता भयावह; पाण्याच्या थेंबासाठी ग्रामस्थांची कसरत

2026-11-22 22:23:29

Solapur : सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता भयावह; पाण्याच्या थेंबासाठी ग्रामस्थांची कसरत

Russia-Ukraine War : रशियाच्या नाविक तळावर युक्रेनचा मारा; मालवाहू जहाजाला लागली आग

2026-11-22 21:43:01

Russia-Ukraine War : रशियाच्या नाविक तळावर युक्रेनचा मारा; मालवाहू जहाजाला लागली आग

Prashant Kishor : 'भाजपमध्ये जेडीयू विलीन करण्याच्या हालचाली'; प्रशांत किशोर यांचा दावा

2026-11-22 21:13:48

Prashant Kishor : 'भाजपमध्ये जेडीयू विलीन करण्याच्या हालचाली'; प्रशांत किशोर यांचा दावा