मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्यासाठी मराठा बांधव नारायण गडावर दाखल होण्यास सुरुवात

Manoj Jarange Patil | मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे हे पहिल्यांदा दसरा मेळावा घेणार आहेत. बीडमधील नारायणगड येथे होणाऱ्या या मेळाव्यात जरांगे मराठा आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करणार आहेत. या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पहिल्यांच मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठ्यांचा दसरा मेळावा होत असल्याने मोठे संख्येने लोकांनी सहभाग घेत तयारी पूर्ण केली आहे.
मनोज जरांगेंचा दसरा मेळावा दुपारी 12 वाजताच्या सुमारास होणार आहे. त्यापूर्वी मराठा बांधव मोठ्या संख्येने नारायण गडावर येण्यास सुरूवात झाली आहे.
बीडमधील नारायणगडावर मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात होणाऱ्या दसऱ्या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली असून 900 एकरावर लाखोंच्या संख्येने मराठा बांधव नारायणगडावर दाखल होत आहेत. 900 एकरावर हा मेळावा होणार असून 500 क्विंटल बुंदीचा महाप्रसाद वाटण्यात येणार आहे.
राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप कायम असून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी पूर्ण न झाल्याने उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील अधिक आक्रमक झाले आहेत. अनेकदा त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी ते काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Manoj Jarange Patil |




