T.Raja Singh Lodh : राजा सिंह यांच्याशी संबंधित अनेक फेसबुक ग्रुप, इन्स्टाग्राम अकाउंट बंद; भाजप आमदार चांगलेच संतापले म्हणाले….

तेलंगणाः भारतीय जनता पार्टीचे तेलंगणा राज्यातील टी राजा सिंह हे एक आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. ते अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात. सोशल मीडियावर टी राजा हे सक्रिय आहेत. त्यांच्या अनेक भाषणांचे व्हिडिओ त्यांच्या अकाउंटवर आहेत. यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कंपनी मेटाने टी राजा सिंह यांच्यावर कारवाई केली आहे. टी राजा सिंह यांच्याशी संबंधित अनेक अकाउंट हटवण्यात आली आहेत. इंडिया हेट लॅब (IHL) च्या अहवालानंतर एका आठवड्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
अधिकृत बंदी असतानाही सिंग आणि त्यांचे समर्थक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुस्लिमांविरुद्ध द्वेषपूर्ण भाषणांना प्रोत्साहन दिले. फेसबुक आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी मेटाने राजा सिंह यांच्याशी लिंक असलेली दोन फेसबुक पेज आणि तीन इन्स्टाग्राम अकाउंट हटवून टाकली आहेत. तसेच त्यांचे सोशल मीडिया खाते, कुटुंबातील सदस्य त्यांचे मित्र यांचे अकाउंट देखील ब्लॉक केले आहे.
हिंदूना लक्ष्य करणारी निवडक सेन्सारशिप
यावर टी राजा सिंह य़ांनी आपली प्रतिक्रिया दिली असून हिंदूंना लक्ष्य करणारी ‘निवडक सेन्सॉरशिप’ असल्याचे ते म्हणाले आहेत. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातल्याचा आरोप त्यांनी केला आहे. टी राजा सिंह यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘हे अत्यंत दुर्दैवी आहे की फेसबुक आणि इंस्टाग्रामने माझे कुटुंब, मित्र, कार्यकर्ते आणि समर्थकांची खाती ब्लॉक केली आहेत. यापूर्वी राहुल गांधींच्या तक्रारीच्या आधारे माझ्या अधिकृत खात्याला चुकीच्या पद्धतीने लक्ष्य करण्यात आले होते. आता माझे व्हिडिओ शेअर करणाऱ्यांनाही गप्प केले जात असल्याचे टी राजा सिंह यांनी सांगितले.
…म्हणून आम्ही त्यांची खाती हटवण्याचा निर्णय घेतला
फेसबुकच्या प्रवक्त्याने एका निवेदनात याची पुष्टी केली आणि म्हटले की, ‘आम्ही राजा सिंह यांना फेसबुकवरून बंदी घातली आहे कारण त्यांनी आमच्या धोरणाचे उल्लंघन केले आहे, ज्या अंतर्गत हिंसा आणि द्वेषाला प्रोत्साहन देणाऱ्या किंवा त्यात सहभागी असलेल्या लोकांना आमच्या प्लॅटफॉर्मवर येण्यापासून रोखले जाते. संभाव्य उल्लंघनकर्त्यांचे मूल्यांकन करण्याची प्रक्रिया विस्तृत आहे आणि म्हणूनच आम्ही त्यांचे खाते काढून टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
या अकाउंटवर करण्यात आली कारवाई
यामध्ये @rajasinghmla, @t.usharajasinghofficial, @t.rajabhaimla1 आणि @t.rajabhaimla3 यांचा समावेश होता, ज्यांचे मिळून सुमारे 198,900 फॉलोअर्स होते.





