Sonali Kulkarni : “आपल्या उंबरठ्यावर पडलेली घाण…”; सोनाली कुलकर्णीने अशोक खरात प्रकरणात व्यक्त केला तीव्र संताप
Sonali Kulkarni : न्यायालयाने अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयानी कोठडी सुनावली आहे.

Sonali Kulkarni : राज्यात अशोक खरात प्रकरणाची चांगलीच चर्चा होत आहे. या प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांचे कनेक्शन देखील समोर येत आहे. नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात अशोक खरातविरोधात आतापर्यंत एकूण 10 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.
अशोक खरातवर लैंगिक छळाचे आरोप करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणावर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने एक संतप्त पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
सोनाली कुलकर्णीची पोस्ट
‘आता तरी श्रध्दा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजून घेऊयात. महिलांवर घृणास्पद अत्याचार, लैंगिक खुळाचार, आर्थिक फसवणूक, ऐय्याशी, भावनिक शोषण.. दांभिकता.. किती संतापजनक, केवढी पिळवणूक. अजूनही आपण म्हणणार का की, आमच्याच धर्मातली अंधश्रध्दा का दिसते? Sonali Kulkarni
आपल्या उंबरठ्यावर पडलेली घाण स्वच्छ करायला नको? की माझी ती पवित्र अस्वच्छता आणि दुसऱ्याची ती दुर्गंधी? महाराष्ट्रात, आपल्या भवताली हे घडतंय. आपण ठगले जातोय.. जागे होऊया,’ अशी पोस्ट सोनालीने खरातप्रकरणी लिहिली आहे. Sonali Kulkarni
अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयान कोठडी
दरम्यान, नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याला नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात करण्यात आले होते. न्यायालयाने अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयान कोठडी सुनावली आहे. त्यानुसार त्याची पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात येणार आहे.
अशोक खरातचा पाय दिवसेंदिवस खोलात चालला आहे. त्याच्याविरोधात महिलांचे लैंगिक शोषण, आर्थिक फसवणुकीस इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच अनेक तक्रारी देखील त्याच्याविरोधात समोर येत आहेत. Sonali Kulkarni
हेही वाचा:





