मानुषी छिल्लर युनिसेफच्या उपक्रमात होणार सहभागी

माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरच्या शिरपेचात आणखीन एक नवीन पिस खोवले गेले आहे. “युनिसेफ’च्या एका देशव्यापी उपक्रमात ती सहभागी होणार आहे. युवकांमध्ये एक चैतन्य असते. हे चैतन्य फक्त योग्य मार्गांनी वापरायचे असते.
येथे चैतन्याने विधायक दीपप्रज्ज्वलन केले जाऊ शकते. युवक हेच देशाचे भवितव्य आहेत. आज युवकांची जोपासना कशी केली जाते, यावर आपला भविष्यकाळ कसा असेल, हे अवलंबून
असतो. भारतात 30 कोटींपेक्षा अधिक युवक आहेत. या युवकांना योग्य प्रकारे कामाला लावले तर भारताचा भविष्यकाळ नक्कीच उज्वल असणार आहे, असे मानुषीने म्हटले आहे.
देशातील युवकांना 21 व्या शतकातील कौशल्याशी तातडीने जोडण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या कल्पनांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे, असेही ती म्हणाली. लवकरच अक्षयकुमार बरोबर “पृथ्वीराज’मधून मानुषी छिल्लर बॉलीवूडमध्ये पदार्पण
करते आहे. त्यामध्ये अक्षयकुमार हा पृथ्वीराज चौहानच्या रोलमध्ये तर मानुषी ही राणी संयोगीताच्या रोलमध्ये दिसणार आहे. मानुषीचा हा पहिला सिनेमा पुढच्या वर्षी 21 जानेवारीला रिलीज होणार आहे.





