पहिलाच चित्रपट फ्लॉप झाल्याने मानुषी छिल्लर झाली होती ‘दुखी’

मुंबई – मिस वर्ल्ड झालेल्या मानुषी छिल्लरने 2022 मध्ये आलेल्या सम्राट पृथ्वीराज या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. 175 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ काहीच कोटींची कमाई केली. तसेच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला होता. या चित्रपटावर चित्रपट समीक्षकांकडून टीकाही करण्यात आली.
आता अलीकडेच मानुषीने हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर वाईटरित्या फ्लॉप झाल्याबद्दल आपलं मत मंडल आहे. मुलाखतीदरम्यान मानुषी छिल्लरने सांगितले की, ‘पहिला चित्रपट फ्लॉप ठरल्याचा प्रभाव माझ्या मनावर खूप खोलवर पडला होता. यानंतर मी खूप दुःखी झाली.’
आतापर्यंत सर्व काही माझ्या बाजूने चालले होते. त्यामुळे मला आयुष्याकडून खूप अपेक्षा होत्या. मी चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली, त्यामुळे जेव्हा चित्रपट चालला नाही, त्यामुळे मी खूप दुखावले. तिने पुढे सांगितले,’मला कळले की इतके लोक एकत्र येतात. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर चित्रपट बनवतो. पण त्याचा परिणाम काय होईल, हे ठरलेले नाही. एक अभिनेत्री म्हणून तुम्ही फक्त तुमचे सर्वोत्तम देऊ शकता, तरीही परिणाम काय होईल हे तुम्ही ठरवू शकत नाही. हा माझा पहिलाच चित्रपट होता, त्यामुळे तो चांगला चालला नाही तेव्हा खूप नुकसान झाल्यासारखे वाटले.’ असेही तिने सांगितले.
मानुषी शेवटी म्हणाली की,माझा चित्रपट फ्लॉप झाला असेला, तरी सुद्धा माझ्याकडे काम आहे या विचाराने मला समाधान मिळते. मानुषी लवकरच अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटात दिसणार आहे. यासोबतच मानुषी जॉन अब्राहमच्या तेहरान या चित्रपटात दिसणार आहे. विकी कौशलसोबत ती द ग्रेट इंडियन फॅमिली या चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.





