Paris Olympics 2024 (10 M Air Pistol Mixed Team) : मनू-सरबज्योत जोडीला कांस्यपदक जिंकण्याची संधी…

Paris Olympics 2024 (10 M Air Pistol Mixed Team) :- भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक मिळवून देणाऱ्या मनू भाकर सरबज्योत सिंहच्या बरोबरीने 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्य पदकाच्या लढतीसाठी पात्र ठरली आहे.
मनू आणि सरबजोत यांनी 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत पदक फेरीत प्रवेश केला असून मंगळवारी त्यांचा सामना दक्षिण कोरियाच्या जोडीशी होणार आहे. कांस्यपदकाच्या लढतीत मनू आणि सरबजोत या जोडीला दक्षिण कोरियाच्या ओह ये जिन आणि ली वोंहो यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
10 M Air Pistol Mixed Qualification Round
Manu Bhaker has a chance at another medal as she and Sarabjot Singh qualify for the Bronze Medal shoot-off with a score of 580 in the 10m Air Pistol Mixed Qualification Round! pic.twitter.com/qJQmELqAin
— SAI Media (@Media_SAI) July 29, 2024
पात्रता फेरीत भारताच्या मनू भाकर आणि सरबजोत या जोडीने 580 गुण मिळवत तिसरे स्थान पटकावले. ओ ये जिन आणि ली वोंहो या कोरियन जोडीने 579 गुणांसह चौथे स्थान पटकावले. मिश्र सांघिक स्पर्धेत चार संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात. अव्वल दोन संघ सुवर्ण आणि रौप्यपदकासाठी, तर तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील संघ कांस्यपदकासाठी लढतील.
मनु भाकरला दुहेरी पदकाची संधी….
दरम्यान, मनू भाकरने रविवारी महिलांच्या 10 मीटर एयर पिस्तूल या प्रकारांत कांस्य पदक जिंकले होते. या पदकाने ती ऑलिम्पिक पदक मिळविणारी भारताची पहिली महिला खेळाडू झाली होती. तिने 12 वर्षांनंतर भारताला ऑलिम्पिक शूटिंग रेंजवर पदक मिळवून दिले आहे. आजच्या कामगिरीने मनूला दुहेरी ऑलिम्पिक पदक मिळविण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.





