मुंबई – राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने उकाडा वाढल्यने नागरिक त्रस्त झाले होते. तर शेतकरीही चिंतेत सापडला होता. परंतु राज्यात पुढील चार ते पाच दिवसांमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला अहे. राज्यात येत्या चार ते पाच दिवसांमध्ये हलका ते मध्यम पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी जारी केलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील चार ते पाच दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी माहिती के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. वाशिम जिल्ह्यात यंदा सुरुवातीला जास्त पाऊस झाल्यामुळे सोयाबीन पिकासह जमीन खरडून गेल्याने शेतकऱ्याचे मोठ नुकसान झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी सावरत मशागत केल्याने सोयाबीन पिक चांगले बहरले आहे. मात्र ऐन फुले आणि शेंगा लागण्याच्या स्थितीत असताना 15 दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन पीक करपत आहे. त्यामुळे येत्या दोन तीन दिवसांत पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर संकट ओढावणार आहे. दुसरीकडे नंदूरबार जिल्ह्यात श्रावण महिन्यात ऑक्टोबर हीटचा अनुभव येत आहेत. जिल्ह्यात तापमानाचा पारा चार अंशांनी वाढून 35 ते 36 अंशवर पोहोचला आहे. बाष्पयुक्त हवेमुळे पिकांवरही परिणाम होत असून सर्वत्र पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. श्रावणात पावसाच्या सरीचा अनुभव येतो. मात्र नागरिक कडक उन्हाचां अनुभव नागरिक घेत आहेत.