Monsoon Update : उत्तर-पश्चिम भारतात मान्सून पुन्हा सक्रिय
Updated On:

नवी दिल्ली – उत्तर-पश्चिम भारतात मान्सुन पुन्हा सक्रिय झाला असून दिल्ली आणि परिसरातही मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो असा इशारा वेधशाळेने दिला आहे. त्यांनी दिल्लीसाठी ऑरेंज ऍलर्टही जारी केला आहे.
दिल्लीत या महिन्यात आत्तापर्यंत 63.2 मिलिमिटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. या महिन्यात दिल्लीत सरासरी 157 मिमि इतका पाऊस पडतो. त्याप्रमाणात दिल्लीत कमी पाऊस झाला असला तरी आता त्या भागात मान्सुन पुन्हा सक्रिय झाला असल्याने तेथे येत्या दोन दिवसात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे असे नमूद करण्यात आले आहे.
उत्तरप्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि दिल्ली या भागात 19 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट या अवधीत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.



