मानसी नाईकने एक्स पतीच्या साखरपुड्यानंतर शेअर केली पोस्ट; म्हणाली “चुकीच्या व्यक्तीसोबत राहण्यापेक्षा…”

Manasi Naik | अभिनेत्री मानसी नाईकचा प्रदीप खरेरापासून घटस्फोट झाला. त्यानंतर सध्या ती एकटी आयुष्य जगत आहे. दोन दिवसांपूर्वी मानसीचा एक्स पती प्रदीप खरेराने साखरपुडा केला. त्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. यानंतर मानसीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
मानसीने सुंदर पिवळ्या साडीतील फोटो शेअर करत पोस्टमध्ये लिहिले की, “आपल्याला काहीतरी मिळत आहे असे म्हणून कोणत्याही गोष्टीवर सेटल होणाऱ्या लोकांच्या या जगात सिंगल राहण्यासाठी खूप धाडस असावे लागते. आयुष्यात Prayer, Priorities, Peace, Positivity, Patience या ‘P’ वर ठाम राहा. जोपर्यंत तुम्हाला साजेसं कोणी भेटत नाही तोपर्यंत सिंगल राहा, सेटल होऊ नका. प्रेमाची आशा ठेवा, प्रेमासाठी प्रार्थना करा, प्रेमाची स्वप्ने पाहा, पण प्रेमाची वाट पाहण्यात तुमचं आयुष्य थांबवू नका. चुकीच्या व्यक्तीसोबत राहण्यापेक्षा सिंगल राहणं कधीही चांगलं आहे. Manasi Naik |
View this post on Instagram
पुढे तिने लिहिले की, “या वर्षी मी हरले, जिंकले, अपयशी झाले, रडले, हसले, प्रेम केले, पण मी झुकले नाही. कणखर स्त्रिया कधीही हार मानत नाहीत. आपल्याला कदाचित कॉफी घ्यावी वाटेल, थोडं रडावं वाटेल किंवा एखादा दिवस काहीच काम न करता अंथरुणात लोळावं वाटेल. मात्र, यानंतर कणखर स्त्रिया आणखी सशक्त होऊन परततात. मी माझ्या वेदना एखाद्या देवीप्रमाणे सहन केल्या. मी कधीही मागे वळून पाहत नाही, मी कधीही हार मानणार नाही, कधीही नाही. चीयर्स टू बीइंग मी,” असं कॅप्शन मानसीने फोटोंना दिले आहे. Manasi Naik |
दरम्यान, मानसी नाईकचा एक्स पती बॉक्सर आहे. तो मॉडेलिंग क्षेत्रातही काम करतो. मानसी आणि प्रदीपने 2021 मध्ये लग्न केले. मात्र त्यांचा दीड वर्षात घटस्फोट झाला. त्यानंतर आता प्रदीपने सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर विशाखा जाटनीसोबत साखरपुडा केला आहे. Manasi Naik |
हेही वाचा:
व्हेनेझुएलामध्ये निकोलस मादुरो राष्ट्रपती होताच उडाला भडका ; जमावाने राष्ट्रपती भवन घेतलं ताब्यात





