Manoj Tiwary : ‘रणजी करंडक’ स्पर्धेवरील भाष्य मनोज तिवारीला भोवले, BCCI ने केली मोठी कारवाई….

Former India player Manoj Tiwary on Ranji Trophy :- बीसीसीआयने भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि पश्चिम बंगालचा क्रीडा मंत्री मनोज तिवारीवर मोठी कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी मनोज तिवारीने रणजी करंडक स्पर्धा बंद करण्याची मागणी केली होती. त्यामुळेच हा दंड ठोठावण्यात आला आहे.
सध्या भारतात रणजी स्पर्धा खेळवली जात आहे. मनोज तिवारी रणजी स्पर्धेत बंगाल संघाचा कर्णधार आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिवारीने बीसीसीआयला रणजी स्पर्धा थांबवण्याची विनंती केली. तिवारी याच्या मते रणजी करंडक स्पर्धेची क्रेझ सातत्याने कमी होत असून या स्पर्धेत खूप सुधारणा करण्याची गरज आहे. बंगाल संघाचा कर्णधार असलेल्या तिवारीला रणजी संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर करणे महागात पडले आहे. आता बीसीसीआयने तिवारीवर मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावला आहे.
रणजीमध्ये बऱ्याच गोष्टी चुकीच्या आहेत ज्यात सुधारणा करण्याची गरज आहे. रणजीची चमकही कमी होत असल्याने मी निराश झालो आहे. इतकेच नाही तर रणजी स्पर्धेची घसरण आणि आयपीएलची वाढती क्रेझ याबाबत त्याने मत व्यक्त केले होते.
रणजी स्पर्धेपेक्षा आयपीएलला प्राधान्य देणाऱ्या इशान किशनसारख्या खेळाडूंवर दबाव आणणे हा आहे. आजकाल युवा खेळाडू प्रथम श्रेणी क्रिकेटपेक्षा लहान फॉरमॅटच्या स्पर्धांना अधिक प्राधान्य देत असल्याचे मनोज तिवारीचे मत आहे.





