मनोज जरांगेंच्या उपोषणाला आजपासून पुन्हा सुरूवात; योजनांवर टीका करत म्हणाले “हा सरकारचा डाव”

Manoj Jarange| आजपासून मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा समाजाला ओबीसीमधूनच सरसकट आरक्षण द्यावे ही त्यांनी मागणी आहे. सरकारने निर्णय घ्यावा यासाठी त्यांनी अल्टिमेटमही दिले होते.
परंतु अद्याप सरकारकडून कोणतीही निर्णय घेण्यात आला नसल्याने आजपासून पाचव्यांदा मनोज जरांगे उपोषणाला सुरुवात करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत ‘आरक्षणाबाबत आम्ही ठाम आहोत’, असे स्पष्ट केले.
मनोज जरांगे पाटील काय म्हणाले ?
“आम्हाला सरकारला जेवढा वेळ द्यायचा होता तेवढा वेळ आम्ही दिला आहे. आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करा. आरक्षणाबाबत आम्ही ठाम आहोत. सगेसोयरेची अंमलबजावणी करा. मराठा आणि कुणबी एकच आहेत. या मागणीत बदल केलेला नाही. सगे-सोयऱ्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. Manoj Jarange|
“मुलींना अद्याप मोफत शिक्षण मिळत नाही. मुलींना मोफत शिक्षण तर अटी कशाला? ईडब्ल्यूएस सरकारमुळे बंद झालंय. ईडब्स्यूएस, एसईबीसी, आणि ओबीसी प्रमाणपत्र हे सुरु ठेवा. मागेल त्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी आमची मागणी आहे. मराठा आणि कुणबी एकचं आहे. जो कायदा आहे. त्यांचे व्यवसाय एकच त्यात दुरुस्ती करा अथवा वेगळा कायदा बनवला तरी हरकत नाही. ज्या मराठ्यांची कुणबी नोंद सापडली, त्यांनी कुणबी प्रमाणपत्र द्यायला हवे”, असेही जरांगे यांनी म्हंटले आहे. Manoj Jarange|
सरकारच्या योजनांवर टीका
“तुम्हाला ना मराठ्यांना ना धनगरांना आरक्षण द्यायचं. नवीन काहीतरी योजना आणतात, लाडकी बहीण, लाडका भाऊ, आता लाडकी मेहुणी-लाडका मेहुणा योजना आणतील, या योजनेमुळे तिथे गर्दी झाल्यामुळे साईट बंद पडले आहेत. एवढा लोड त्या ठिकाणी आला आहे. सरकारने हा डाव टाकलेला आहे. तुम्ही १५०० रुपये देतात ते तीन दिवस पुरणार नाहीत. १५०० रुपये घेऊन आम्हाला आयुष्याला पुरणार आहेत का? सर्व जातींना अशा योजना जाहीर करून तुम्ही आरक्षणापासून वेगळ करू शकत नाहीत,” असे जरांगे यांनी म्हंटले आहे.
हेही वाचा:
ग्राहकांना दिलासा…! सोन्या चांदीच्या दरात ‘घसरण’, जाणून घ्या, तुमच्या शहरातील ‘बाजार भाव’





