Manoj Jarange : मनोज जरांगेंची तब्येत बिघडली; उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल
Manoj Jarange : मनोज जरांगे यांची तब्येत अचानक बिघडल्याची माहिती समोर आली असून त्यांना छत्रपती संभाजीनगरमधील येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात येणार आहे.

Manoj Jarange’s health has deteriorated : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी नुकताच पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला. येत्या २९ अॅागस्टपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. याशिवाय कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याच्या मुद्यावरुन त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. अशातच मनोज जरांगे यांची तब्येत अचानक बिघडल्याची माहिती समोर आली असून त्यांना छत्रपती संभाजीनगरमधील येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात येणार आहे.
नेमकं काय झालयं?
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे यांना अचानक चक्कर ,ताप, मळमळ होण्याचा त्रास वाढल्याची माहिती आहे. यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात येत आहे. त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.
अचानक तब्येत का बिघडली?
मनोज जरांगे यांनी सरकारला पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला. ८ अॅागस्टला या दौऱ्याला सुरुवात झाली. विविध ठिकाणी जात त्यांनी मराठा समाजाशी संवाद साधला. ठिकठिकाणी बैठका घेतल्या. या दरम्यान रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत दौरे यामुळे त्यांच्या शरिरावर याचा परिणाम झाला असून त्यांची तब्येत बिघडली असल्याचे सांगण्यात येत आहे.





