मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार! थेट मुंबईत धडकणार मोर्चा; तारीखही निश्चित…

Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे राज्यव्यापी बैठक घेतली. ज्यात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी पुन्हा एकदा चलो मुंबईची हाक जरांगे यांनी दिली आहे. 29 ऑगस्ट रोजी लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईत धडकणार आहे.
27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी सोडून 29 ऑगस्टला मुंबई गाठायची. आता मागे हटायचे नाही. विजय मिळवायचा, त्याशिवाय मुंबईतून वापस फिरायचे नाही. आता ही लढाई आरपारची आणि अंतिम असेल, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे झालेल्या राज्यव्यापी बैठकीत दिला. आता रणभूमीत उतरायचं, लढायचं आणि विजयाचा गुलालही मराठ्यांनीच उधळायचा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
मराठा आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्यात आहे, 58 लाख नोंदी सापडल्या असून 4 कोटी मराठा समाज आरक्षणात गेला आहे, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला. फक्त 7 ते 8 टक्के समाज राहिला आहे, त्यासाठी आता ही आरपारची लढाई असल्याचे जरांगे म्हणाले. Maratha Reservation |
विजय मिळवल्याशिवाय परतायचं नाही…
राजकीय लोक त्यांच्या पक्षासाठी, निवडणुकीसाठी रात्र-दिवस मरमर करतात, मात्र तुमच्यासाठी, तुमच्या लेकरासाठी व तुमच्या जातीसाठी कोणीच मरमर करत नाहीत. कोणत्याही पक्षाचा मराठा असू द्या, त्यांनी आपल्या लेकराच्या अंगावर गुलाल टाकण्यासाठी सज्ज राहा. आता फक्त 8-9 नऊ टक्केच मराठा आरक्षणामध्ये जायचे राहिला आहेत, हे सरकारलाही माहित आहे. मैदान गाजवायचं, विजय मिळवल्याशिवाय परतायचं नाही. लाखो मराठे एकत्र आलेत, आता विजयापासून कोणी रोखू शकत नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले. दोन वर्ष झाले आपण लढतोय. हा संघर्ष लढाई आता जिंकायची म्हणजे जिंकायची, ही अंतिम लढाई आता पार पाडायची, असेही त्यांनी यावेळी म्हटले. Maratha Reservation |
हेही वाचा:
तू हडकूळी अन्…; समंथाने ट्रोलर्सना चांगलचं सुनावलं; थेट वर्कआऊटचा व्हिडीओच शेअर केला म्हणाली…




