maratha reservation : मुख्यमंत्र्यांसमोर मनोज जरांगेंचं मोठं विधान,’आरक्षणात मारलेल्या खुट्ट्या आम्ही ….’

maratha reservation – राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आज पहाटेच राज्य सरकारकडून त्याचे अध्यादेश काढण्यात आले आहेत. अशात आज सकाळी १० च्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं.
यानंतर मनोज जरांगे आंदोलकांशी बोलतांना म्हणाले,’जेव्हा आम्ही मुंबईकडे कूच करत असताना आम्हाला सांगितलं जात होतं की तिकडं जाऊन काही होणार नाही. ही पोरं तिकडं जाऊन राडा करतील, असं बोललं जात होतं.’
असं म्हणत येते पुढे म्हणाले,’ मात्र आम्ही आरक्षण घेणारच असं ठरवून घरून निघालो होतो. आम्ही २९ ऑगस्टला म्हटलं होतं, आरक्षणात मारलेल्या खुट्ट्या आम्ही उपटून फेकणार…ज्यांनी पाचर मारलीय ती काढून फेकणार…मराठ्यांचा नादी लागायचं नाही. आम्हाला छेडण्याचा प्रयत्न केला तर आमचा नाईलाज आहे. आम्ही आत्ताही गावखेड्यात ओबीसी आणि मराठ्यांमध्ये वाद होऊ दिला नाही. यापुढेही होऊ देणार नाही. कारण आम्ही लहान-मोठे भाऊ म्हणून गुण्यागोविंदाने राहतो.’ असेही ते म्हणाले आहे.





