Manoj Jarange : ..तर वर्षा बंगल्यावर येऊन बसेन; मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे आंदोलनावर ठाम
Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमची मुदत २८ ऑगस्ट रोजी संपत असल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरपारच्या लढ्याची घोषणा केली आहे.

Manoj Jarange : मराठा समाजाला अद्याप आरक्षण मिळालेले नाही. सरकार आपल्या लेकरांचे वाटोळे करत आहेत. मराठ्यांनी जागे व्हावे. तसेच सरकारने मागण्यांवर ठोस निर्णय घेतला नाही तर आंदोलनाची दिशा अधिक तीव्र होईल. मी वर्षा बंगल्यावर येऊन बसेन, असा इशाराही मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला. (Manoj Jarange)
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमची मुदत शुक्रवारी (28 ऑगस्ट) संपत आहे. अशामध्ये आता मनोज जरांगे यांनी घोषणा केल्याप्रमाणे 29 ऑगस्टपासून आंदोलन होणार आहे. (Manoj Jarange)
दरम्यान, 24 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यात अंतरावली सराटी येथे झालेली बैठक निष्फळ ठरली होती. त्यावेळी त्यांनी 28 ऑगस्टपर्यंतची वेळ राज्य सरकारला दिली होती. (Manoj Jarange)
मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत म्हटले की, सरकारकडून मराठ्यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले नसल्याचे सांगितले जात आहे. ज्यांनी अर्ज केले आहेत त्यांनी पुढे यावे. तसेच ज्यांनी अर्ज घेऊन कार्यालयात गेले. मात्र अधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकारला नाही. (Manoj Jarange)
तसेच ज्यांची व्हॅलिडिटी थांबवण्यात आली आहे, त्यांनीही आंदोलनाच्या ठिकाणी यावे. मराठा समाजातील बांधवांनी घरात बसून राहू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. वंशावळ सापडली, पण महसुली पुरावा उपलब्ध नसेल तर काय करायचे? वावर नाही म्हणून आम्ही मराठे नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. (Manoj Jarange)
Manoj Jarange : …तर वर्षावर आंदोलनाला बसणार : मनोज जरांगेंचा मोठा इशारा





