Manoj Jarange: मनोज जरांगेंचे उपोषण स्थगित! शिष्टमंडळाच्या चर्चेनंतर मोठा निर्णय; सरकार दिला अल्टिमेटम
Manoj Jarange:

Manoj Jarange: मराठा आरक्षणासाठी मागील 20 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. अखेर जरांगे यांनी सरकारच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. उपोषणामुळे जरांगे यांची तब्येत अधिकच खालावली, मात्र तरीही ते मुंबईकडे जाण्यावर ठाम होते.
परंतु काल (17 सप्टेंबर) सकाळी बीड येथील पाटोदा येथे सरकारचं शिष्टमंडळ मंत्री राधाकृष्ण विखे, मंत्री दादा भुसे, आमदार प्रसाद लाड, आमदार सुरेश धस, बीड जिल्हाधिकारी यांच्यात यशस्वी चर्चा झाली.
मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस सरकारला ३ महिन्यांची मुदत दिला आहे. ‘मी आज उपोषण स्थगित करतो, मात्र आंदोलन सुरुच राहणार आहे. जर सरकारने धोका दिला, तर आम्ही मुंबई गाठणार,’ असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला. Manoj Jarange
महत्त्वाचे मुद्दे आणि मागण्या:
- सातारा, कोल्हापूर, पुणे, औंध संस्थानांच्या गॅझेटियरनुसार जीआर काढण्यासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला ३ महिन्यांचा वेळ दिला
- हैदराबाद गॅझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करावे आणि त्यांना तात्काळ वैधता द्यावी.
- हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्रे देण्यासाठी सुधारीत जीआर काढा.
- शिंदे समितीस मिळालेल्या ५८ लाख कुणबी नोंदींपैकी एकही नोंद कमी होणार नाही, हे सरकारने लेखी द्यावं.
- मराठवाडयातील 4 लोकप्रतिनिधींची रद्द केलेली कुणबी प्रमाणपत्रे वैध करु.
- सातारा संस्थानचा गॅझेट लागू करण्यासाठी सरकारला 3 महिन्यांचा वेळ द्यावा लागेल. नोंदीवर मुख्यमंत्र्यांची सही असावी.
- EWS आणि SEBC चे विषय लवकरात लवकर मार्गी लावावेत, ‘सारथी’ संस्थेचे प्रलंबित प्रश्न सोडवावे.
- आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या आंदोलकांच्या कुटुंबांचा अवमान थांबवून त्यांना योग्य न्याय द्यावा.
View this post on Instagram
शिष्टमंडळाची आश्वासने
- सातारा, कोल्हापूर आणि औंध संस्थानांचा सुमारे १६०० पानांचा अहवाल ३ ते ४ महिन्यांत पूर्ण होईल. हैदराबाद गॅझेटच्या जीआरमध्ये आवश्यक सुधारणा केल्या जातील.
- सर्व जात पडताळणी समित्यांची विशेष शिबिरे भरवून समाजाची कोणतीही फसवणूक होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
- मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार नियमांत बसवून जीआर दुरुस्तीची प्रक्रिया केली जाईल, असा विश्वास दादा भुसे यांनी व्यक्त केला.
- मुख्यमंत्री आपल्या भाषणात यावर अधिकृत भूमिका मांडतील, असे प्रसाद लाड यांनी सांगितले.
हैदराबाद गॅझेट संख्येनुसार कुणबी प्रमाणपत्र आणि व्हॅलीडिटी द्यावी लागणार, हैद्राबाद गॅझेट जीआर सुधारीत करून द्या. हिंदू वाणी, हिंदू वैश्य आणि वैश्य वाणी या तिन्हीही जाती एकच असल्याचा जीआर अलीकडे राज्य सरकारने काढला आहे. तसा जीआर मराठा कुणबी एकच असल्याचा जीआर काढा. स्वतंत्रपूर्व काळात मराठा हा कुणबी होता. नजरचुकीने तो आरक्षणात घ्यायचा राहिला, असा उल्लेख वरील जातीचा जीआर काढताना केला, तसा आमच्या जीआरमध्ये टाका, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली. Manoj Jarange
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माझे वैरी नाहीत, पण समोरून वार आला तर काय करणार?” असा प्रश्न जरांगेंनी उपस्थित केला. Manoj Jarange
हेही वाचा:





