Manoj Jarange : मराठ्यांचे मुडदे पडू देऊ का?; मनोज जरांगे भुजबळांवर भडकले, दिला थेट इशारा….

Chhagan Bhujbal । Laxman Hake । Manoj Jarange : लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे मागील काही दिवसांपासून ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा दहावा दिवस असून काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर ओबीसी शिष्टमंडळाची सरकारसोबत महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर सरकारी शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांची भेट घेऊन चर्चा केली आहे.
या शिष्टमंडळामध्ये 5 मंत्र्यांसह 12 जणांचा समावेश आहे. छगन भुजबळ, धनंजय मुंडे, गिरीश महाजन, उदय सामंत, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, गुलाबराव पाटील यांच्यासह इतर नेत्यांचा देखील यामध्ये समावेश आहे.
यावेळी छगन भुजबळ यांनी उपस्थितांना संबोधित केलं. ‘लढाई संपलेली नाही. निवडणुकीच्या आधी सुद्धा, निवडणुकीनंतरही गावागावत हल्ले करण्यात आले. मारपीठ करण्यात आली. पोलिसांनी डोळेझाक केली. हे सर्व पाहून वेदना झाल्या.
एक लक्षात ठेवा, कोणी किती मोठी शक्ती असली जेव्हा लोकशक्ती एकत्र येते तेव्हा त्या शक्तीचा पराभव झाल्याशिवाय राहत नाही. लोकशाहीमध्ये धनशक्ती किंवा इतर कोणतीही शक्ती नाही तर लोकशक्ती अत्यं मोठी आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “ओबीसींचे दोन वाघ उपोषणाला बसले आहेत. दहा दिवस झाले आहेत. आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर काही मंत्री यांच्याशी चर्चा केली. ओबीसी संस्थाचे नेते होते. आम्ही सह्याद्रीवर चर्चा केली. काल ज्याप्रमाणे मिटिंग झाली.
गिरीश महाजन, उदय सामंत, धनंजय मुंडे, गुलाबराव पाटील, गोपीचंद पडळकर, माजी खासदार समीर भुजबळ सर्व नेते काल बैठकीला होते. गेले दहा दिवस अनेक ठिकाणी उपोषण सुरू आहे. पुण्यात मंगेश ससाणे आहेत. ठिकठिकाणी आम्ही समजूत घातली.
आमचे वाघ परत मैदानात रस्त्यावर हवे आहेत. धमक्या खूप देतात. आम्ही कुणालाही धमक्या दिल्या नाही. शरीफ है हम, किसीसे लडते नही है, मगर जमाना जानता है हम किसी के बाप से भी डरते नही है..! असा शायरीतून इशारा भुजबळ यांनी दिला.
तर, दुसरीकडे मनोज जरांगे यांनी देखील माध्यमांशी संवाद साधून आपली भूमिका मांडली आहे. ‘छगन भुजबळ काय करायचय ते कर, मराठे आधी कोणाच्या अंगावर जाणार नाहीत. मराठ्यांच्या अंगावर आले, तर आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरणार’ असा इशाराच जरांगे यांनी यावेळी दिला.
त्यांचे वाघ आहेत, आमचे पण कुणीतरी असतीलच ना…
‘छगन भुजबळ 100 टक्के दंगल घडवणार. धनगरांनी वाद चिघळू देऊ नये. शेवटी निर्णय तुमचा आहे. त्यांचे वाघ आहेत, आमचे पण कुणीतरी असतीलच ना. महाराष्ट्रात रस्त्यावर उतरुन दंगल घडवून आणण्याला छगन भुजबळ जबाबदार असणार” असं मनोज जरांगे म्हणाले.
‘भुजबळांच ऐकून वाटोळ करुन घेऊ नका. गोरगरीबांमध्ये भांडण लावण्यापलीकडे काय येतं? धनगर बांधवांना मराठ्यांची नाराजी ओढवून घ्यायला लावतोय हे धनगर बांधवांनी समजून घ्याव” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मी कणखर मराठ्यांच्या मागे उभा आहे…
‘आमच्या ओरिजनल नोंदी आहेत. मराठ्यांना आरक्षण देऊ नये, ते खोट आहे, असं कसं म्हणता?. सत्तेत राहून आंदोलन उभी करतो. रस्त्यावर उतरायची भाषा करतो. सरकारमधले लोक मला जातीयवादी म्हणतात, मी कणखर मराठ्यांच्या मागे उभा आहे.
हे रस्त्यावर उतरायची भाषा करतात, मग मी हात बांधून बसू का? भांडण लावत असेल, दंगली घडवत असेल, मराठ्यांचे मुडदे पडू देऊ का? माझा मराठ्यांच्या नेत्यांना सवाल आहे. मराठ्यांना आरक्षण मिळू नये, मराठ्यांची पोर मोठी होऊ नये.. ही भयानक नियत आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
‘छगन भुजबळ काय करायचय ते कर’
“मराठ्यांची मत घेता. बुरखा फाटला आहे. खरे चेहरेबाहेर आले आहेत. मला जातीयवादी ठरवता, मराठा नेत्यांनी थोडं शहाणं व्हायला पाहिजे. ते काय करत नाही. आपण एकटे 50-55 टक्के आहोत.
नाईलाज आहे मराठ्यांचा, छगन भुजबळ काय करायचय ते कर, मराठे आधी कोणाच्या अंगावर जाणार नाहीत. मराठ्यांच्या अंगावर आले, तर आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरणार. चॅलेंज आहे, वाघाची भाषा करतो, मराठा सुद्धा घरात बसणार नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.





