Manoj Jarange Patil Reply To Ajay Baraskar । मनोज जरांगे यांच्या कोअर कमिटीचे सदस्य असलेले अजय महाराज बारसकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. बारसकर यांनी जरांगे पाटील यांच्यावर यावेळी गंभीर आरोप केले आहे. जरांगे यांनी संत तुकाराम महाराजांचा अपमान केला असा आरोप त्यांनी केला. तसेच मी पाणी पाजायला गेलो असताना त्यांनी संत-फिंत गेले खड्ड्यात असं वक्तव्य जरांगे यांनी केलं असल्याचे बारसकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितल.
यावर आज पत्रकारांशी संवाद साधतांना मनोज जरांगे पाटील यांनी बारसकर यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिल आहे. ते म्हणाले,’माझ्याकडून चिडचिडीत ते शब्द निघून गेले. जगतगुरु तुकाराम महाराजांच्या अडून मराठ्यांचं वाटोळं करायच्या नादात पडू नका, असे म्हणत जरांगे पाटलांनी बारसकर यांना इशाराच दिला आहे. फक्त तुकाराम महाराजांबद्दल मी केलेल्या विधानावर माफी मागणार आहे. असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी अजय महाराज बारसकर यांनी केलेले सर्व आरोप फेटाळत त्यांच्यावर निशाणा साधत प्रत्युत्तर दिलं आहे.
ते पुढे म्हणाले,’जगतगुरू तुकाराम महाराज यांच्या आड लपून तुम्ही आंदोलन संपवू नका, हे पाप तुम्हाला फेडावे लागेल. महाराजांची बदनामी होईल, समाजाचे नुकसान करू नका. हा सरकारचा ट्रॅप आहे. अजय बारसकर यांच्यासोबत आणखी 10 ते 15 माणसं आहेत, जे मला बदनाम करण्याचा विचार करत आहे. यामागे पूर्णपणे सरकारचे षडयंत्र आहे. बारसकर यांना काही तरी मिळवायचे आहे, त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या, मी असल्या चिल्लर महाराजांना मानत नाही.’ असेही जरांगे म्हणाले आहे.
हेही वाचा
Narendra Modi on sugarcane farmers | शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान केंद्राची ५ कोटी शेतकऱ्यांना भेट, ऊस खरेदी दरात ‘मोठी वाढ’
gold silver price today। खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या सोन्या-चांदीचा आजचा ‘भाव’