Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती
Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर दौरे आणि आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावली आहे. पश्चिम महाराष्ट्राचा दौरा पूर्ण केल्यानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Manoj Jarange)
102 अंश ताप, उलट्याही झाल्या
वैद्यकीय माहितीनुसार, मागील दोन दिवसांपासून जरांगे पाटील यांना प्रचंड ताप आणि थंडी जाणवत होती. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांना उलटीही झाली. शुक्रवारी रात्री सुमारे 11.15 वाजता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांना तब्बल 102 अंश ताप असल्याची माहिती आहे. सततचे दौरे, भाषणे, अपुरी झोप आणि मोठ्या प्रमाणातील धावपळीमुळे त्यांच्या शरीरावर ताण आल्याचे सांगण्यात येत आहे. घशाचा त्रासही वाढला आहे. (Manoj Jarange)
टायफॉइडची प्राथमिक लक्षणे
डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांच्यामध्ये टायफॉइडची प्राथमिक लक्षणे आढळल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, अहवालानंतर पुढील उपचार निश्चित केले जाणार आहेत. (Manoj Jarange)
डॉक्टरांचे विशेष पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. त्यांना किमान चार दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या काळात दौरे किंवा सार्वजनिक कार्यक्रम टाळण्याचेही डॉक्टरांनी सांगितले आहे. (Manoj Jarange)

प्रकृती स्थिर; समर्थकांमध्ये चिंता
सध्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. मात्र अशक्तपणामुळे ते अद्याप झोपून असल्याचे सांगण्यात आले आहे. जरांगे पाटील रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये चिंता निर्माण झाली असून, ते लवकर बरे व्हावेत यासाठी समर्थकांकडून प्रार्थना केली जात आहे. (Manoj Jarange)
Manoj Jarange : मनोज जरांगेची प्रकृती बिघडली; मराठा आंदोलकांची चिंता वाढली





