Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंची प्रकृती पाहून डॉक्टर चिंतेत; म्हणाले, ‘किडनी आणि मेंदू…’

Manoj Jarange Patil – मराठा समाजाला आरक्षण (maratha reservation) मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात बेमुदत उपोषणाला बसलेले कार्यकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी आरोग्य तपासणी करून घेण्यास नकार दिला आहे.
दीर्घ काळाच्या उपोषणाचा परिणाम जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या महत्वाच्या अवयवांवर आणि आरोग्य विषयक मापदंडांवर होऊ शकतो, असे जालन्याचे कार्यवाहक सिव्हिल सर्जन डॉ. प्रताप घोडके यांनी म्हटले आहे.
जरांगे यांची प्रकृती खालावल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची सरकारी डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी केली जाणार होती. पण ती जरांगे यांनी फेटाळून लावली आहे.
डॉ घोडके म्हणाले, की वरीष्ठ सरकारी अधिकारी आणि डॉक्टर दर 2-3 तासांनी यांच्याकडे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी जात आहेत परंतु, प्रत्येक वेळी आरोग्य तपासणी आणि उपचार करण्यास नकार दिला जात आहे.
त्यामुळे त्यांच्या किडनी आणि मेंदूसारख्या महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम होऊ शकतो. साखरेची पातळी कमी होऊ शकते आणि त्याच्या इलेक्ट्रोलाइट्सच्या पातळीला बाधा येऊ शकते.
आम्ही त्यांच्या फॅमिली डॉक्टरांशी तसेच अंतरवली सराटीतील इतर डॉक्टरांशी संपर्क साधला आहे. आज गावकरी जरंगे यांना वैद्यकीय उपचार घेण्याची विनंती करणार आहेत,असेही त्यांनी सांगितले.





