Manoj Jarange Patil Dasara Melava 2024 । वेळेप्रसंगी मी मरण पत्करेन पण मागे सरणार नाही

Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगे यांचा लढा सुरु आहे. सगेसोयरेंची अधिसूचना लागू करून सरकारने मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीसाठी जरांगे यांनी अनेकदा उपोषण केले. मात्र, सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र 10 टक्के आरक्षण दिलं आहे. त्यांनी आतापर्यंत जरांगे यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही. यातच आज मनोज जरांगे पाटील बीडमध्ये नारायण गडावर दसरा मेळावा घेणार आहे.
– ‘माझा समाज माझासाठी झिजला..’
वेळेप्रसंगी मी मरण पत्करेन पण मागे सरणार नाही
मला चारही बाजूने घेरलं आहे, माझ्या समाजाला, माझ्या समाजाच्या लेकरांना कलंक लागू देऊ नका
– मनोज जरांगे यांचे भाषण चालू, सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराजांना केला मानाजा मुजरा
मनोज जरांगे यांचे नारायणगडावरील भाषण चालू झाले आहे.त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच शब्दांच्या रुपात शिवाजी महाराजांना मुजरा केला. जमलेल्या लोकांचे आभार मानले.
– मनोज जरांगे दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर दाखल; काय भूमिका घेणार ?
– मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्यासाठी तुफान गर्दी; पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात





