Manoj Jarange : ‘मनोज जरांगेंवर उपोषणाची वेळ येणार नाही’, ‘या’ भाजप नेत्याने केले मोठे विधान

अहिल्यानगर : 20 नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकीच मतदान पार पडलं होते. उद्या म्हणजे शनिवारी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोणते सरकार येणार हे उद्या स्पष्ट होईल. या निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा किती प्रभाव पडणार हेदेखील पाहणे महत्वाचे असणार आहे.
अशात या निकालानंतर मनोज जरांगे उपोषणाला बसणार आहेत. मात्र मनोज जरांगेंवर उपोषण करण्याची वेळ येणार नाही असे विधान भाजपच्या एका मोठ्या नेत्याने केल्याने राजकीय वर्तुळात त्याची चर्चा रंगली आहे.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
एकदा ईव्हीएम मशीन मध्ये मत बंद झाली की अंदाज व्यक्त करून काही नवीन होणार नसत. पण काही सर्वे महाविकास आघाडीच्या बाजूने गेले असतील तरी बहुतांश मेजॉरिटी एखादा अपवाद सोडला तर बाकीचे सगळे महायुतीच सरकार येईल असच दाखवत आहे.सरकार वनवे 160 च्या खाली नाही तर ब्रॅण्डेड 160 च्या पुढे असेल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या निकालानंतर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावर मनोज जरांगे यांना उपोषण करण्याची वेळ नवीन सरकार येऊ देणार नाही,असे भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. सध्या त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.





