Manoj Jarange : “आता यांना उखडून फेकावंच लागणार…’; मनोज जरांगेंचा शिंदे सरकारला थेट इशारा, Video पाहा…

Updated On:

Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगे यांचा लढा सुरु आहे. सगेसोयरेंची अधिसूचना लागू करून सरकारने मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या मागणीसाठी जरांगे यांनी अनेकदा उपोषण केले. मात्र, सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र 10 आरक्षण दिलं आहे. त्यांनी आतापर्यंत जरांगे यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही. यातच आज मनोज जरांगे पाटील बीडमध्ये नारायण गडावर दसरा मेळावा घेत आहेत.

यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून राज्य सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला. आचारसंहितेची डेडलाईन देत त्यांनी मराठा आरक्षणावर वेळीच भूमिका न घेतल्यास गणित उलटवण्याचा इशारा त्यांनी दिला.

मनोज जरांगे आपल्या भाषणात म्हणाले की, “यांना उखडून फेकावंच लागणार आहे. सुट्टी नाही. आपल्यावर डोळ्यादेखत अन्याय करत असेल तर समोरच्याला उखडून फेकावंच लागेल, त्याशिवाय सुट्टी नाही. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपल्याला लढावं लागेल.

अनुदान नाही, पिकविमा नाही, मराठा आरक्षण नाही, धनगर आरक्षण नाही, कैकाडी, महादेव कोळी, लिंगायत यांना खाऊ दिलं जात नाही. मुस्लिम आणि दलितांना काही दिलं जात नाही. आपणच सर्वांसाठी झुंजत आहोत.

आपणच सर्वांना न्याय देणार आहोत, काही लोक कशासाठी भिजत आहे. आपण जातीसाठी भिजत आहोत. काय होतं त्याला. याला शुभसंकेत समजा. आता तर गाडलेच समजा, असे त्यांनी स्पष्ट केले.

आरक्षणाला धक्का लागतोय बोलणारा कुठे आहे?

तुम्ही आमच्यामध्ये येवू नका. आमच्यात मागणी करू नका. आधीच भरपूर आहेत. त्यामुळे तुम्ही या आरक्षणात येऊ नका. आमचं कमी होत आहे. तुम्ही काल परवा मोठ्या 17 जाती आरक्षणात घातल्या आहेत.

आता तुम्हाला धक्का लागला नाही का? धक्का लागतो म्हणलेला कुठे आहे? आमच्यात येऊ नको म्हणलेला कुठं आहे. इतका द्वेष. तुम्हीच बोलला गोर गरीब ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. कारण याच्यामध्ये भरपूर जण आहेत. आता त्या 17 जाती घातल्या तेव्हा तुम्ही ओबीसी समाजाचा विचार का केला नाही.

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

2026-10-07 21:58:13

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

2026-10-07 20:57:05

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

2026-10-07 19:39:08

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

2026-10-07 19:04:11

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

2026-10-07 18:16:30

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...