मनोज जरांगेंना दारात पाहून धनंजय देशमुखांना अश्रू अनावर ; धाय मोकलून रडले, गावकरीही सुन्न

Manoj Jarange Meet Santosh Deshmukh। बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मारहाणीचे १५ फोटो आणि ३ व्हिडीओ व्हायरल झाल्याने माणसातील राक्षसांचा चेहरा जगासमोर आला आहे. देशमुखांवर झालेल्या क्रौर्याचे फोटो संपूर्ण राज्यासमोर आल्याने पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे. त्यातच काल रात्री हे फोटो समोर आल्याने मनोज जरांगे यांनी तातडीने आज सकाळीच मस्साजोग गाठत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांची भेट घेतली.
धनंजय देशमुखांना अश्रू अनावर Manoj Jarange Meet Santosh Deshmukh।
मनोज जरांगेंच्या भेटीवेळी धनंजय देशमुखांना अश्रू आवरले नाहीत. मनोज जरांगेंना दारात पाहून धनंजय देशमुखांनी हंबरडा फोडला. गळ्यात पडून लहान लेकरसारखे धनंजय देशमुख रडले. मनोज जरांगेंनी धनंजय देशमुखांचे सांत्वन केले.
धनंजय देशमुखांना पाहून मनोज जरांगेंना देखील अश्रू अनावर झाले. धनंजय देशमुख आणि मनोज जरांगेंच्या भेटीदरम्यान मस्साजोग गावचे काही गावकरी देखील तेथे उपस्थित होते.
धनंजय देशमुखांना पाहून गावकरी देखील सुन्न Manoj Jarange Meet Santosh Deshmukh।
धनंजय देशमुखांना पाहून गावकरी देखील सुन्न झाल्याचं पाहायला मिळालं. ऐरवी सकाळपासून आपली आस्थापने खुली करण्यासाठी व्यापाऱ्यांची लगबग पाहायला मिळते. मात्र या बंदच्या अनुषंगाने बाजारपेठा बंद ठेवल्या गेल्या आहेत.
संतोष देशमुख हाता प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जावी. अशी मागणी यादरम्यान केली जातेय.
हेही वाचा
धनंजय मुंडे राजीनामा देणार? ; देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्यात तब्बल २ तास चर्चा ; बैठकीत नेमकी काय चर्चा ?
Amol Mitakari : शंभूराजांची बदनामी करणाऱ्या साहित्यावर बंदी घालावी: अमोल मिटकरींची सरकारकडे मागणी, सर्वपक्षीय नेत्यांनी दर्शविला पाठिंबा





