मनोज जरांगे की नही चलेगी…; गुणरत्न सदावर्ते यांचा मनोज जरांगेंवर थेट हल्ला

Gunaratna Sadavarte | Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे. त्यातच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासह आता मुस्लिमांच्या आरक्षणाची मागणी केली होती. तेपण ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली होती. अश्यातच आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी ते समाज माध्यमांशी बोलत होते.
गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, “येणाऱ्या काळात मनोज जरांगे पाटील की नही चलेगी… असं म्हणत सामाजिक सलोखा फक्त मनोज जरांगे बिघडवत आहे. दुसरा कोणी बिघडवत नाही, असा थेट आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. इंव्हॉल्युवेशन ऑफ कास्ट काय आहे?
हे मनोज जरांगे पाटील यांना माहिती नाही. आम्ही संविधानाच्या भाषेत लढाई करतो आणि तुम्ही अत्याचाराची ताकद वापरून बोलत आहात. त्यामुळे या राज्यात संविधान समजत नसेल तर आरक्षणाचं गलिच्छ राजकारण करू दिलं जाणार नाही, अशी टीका देखील गुणरत्न सदावर्ते यांनी लावला आहे.
छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंना डिवचले –
नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना भुजबळ यांनी, ”मनोज जरांगेंचा अभ्यास कमी आहे. त्यांनी आधी अभ्यास करावा. मुस्लिम समाजाला 25 वर्षांपूर्वीच ओबीसीतून आरक्षण दिले आहे,” असे म्हणत मनोज जरांगेंवर टीका केलीय.
राज्यात काही ठिकाणी मुस्लीम समाजाच्याही कुणबी म्हणून नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे आता मुस्लिमांनाही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवर निशाणा साधलाय.
छगन भुजबळ पुढे म्हणाले, “मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी कोण करताय, जरांगे करताय, त्यांचा अभ्यास कमी आहे. त्यांना म्हणावं आधी अभ्यास करा. मुस्लिम समाजाला 25 वर्षापूर्वीच ओबीसीतून आरक्षण दिले आहे. कधी मुस्लिमांना तर कधी धनगर समाजाला खुश करण्यासाठी ते मागण्या करत असल्याची टीका त्यांनी केली आहे.





