मनोज जरांगे पुन्हा एकदा मैदानात, आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण

Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे आजपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी जालनामधील अंतरवाली सराटीत जरांगे हे उपोषणाला बसणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत सात वेळा आमरण उपोषण केले आहे.
आता पुन्हा नवीन सरकार राज्यात अस्तित्वात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील आठव्यांदा आजपासून आमरण उपोषण करणार आहे. आज दहा वाजता मनोज जरांगे आमरण उपोषणाला सुरवात करणार आहेत. एकुण आठ मागण्यांसाठी जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. Manoj Jarange |
मनोज जरांगेंच्या कोणत्या मागण्या आहेत?
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, सगे- सोयरे अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करावी, हैदराबाद गॅझेटिअर, सातारा संस्थान गॅझेटिअर, बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅझेटियर लागू करून त्यांची तात्काळ अंमलबजावणी करा, मा. न्यायमूर्ती शिंदे साहेब समितीने राज्यभर कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू करावे आणि मा. शिंदे समितीला एक वर्ष मुदत वाढ द्यावी, मराठा आंदोलकांवर दाखल झालेल्या केसेस मागे घ्याव्या, कुणबी नोंदी शोधण्यासाठी, कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी, कुणबी प्रमाणपत्र व्हॅलिडीटी देण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर स्थापन केलेले कक्ष पुन्हा सुरू करावे. Manoj Jarange |
मराठ्यांची पोटजात-उपजात कुणबी आहे. म्हणून मराठा आणि कुणबी एकच आहे. हा सुधारित जीआर काढून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, वंशावळ समिती मोडी लिपी समिती व सर्व भाषेचे अभ्यासक यांची मोठी टीम तात्काळ नोंदी शोधण्यासाठी तयार करण्यात यावी, सरकारने 10 टक्के SEBC आरक्षण लागू केले आणि मराठा समाजाचे ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द केले ते ईडब्लूएस आरक्षण पुन्हा सुरू करावं, अशी मागणी त्यांनी केली आहे. Manoj Jarange |
जरांगेंचा सरकारला इशारा
“मुख्यमंत्री फडणवीस आमच्याशी दगाफटका करणार नाहीत. फडणवीस आम्हाला आरक्षण देणार आहेत. फडणवीस यांना मराठे मोठे व्हावे वाटतात की नाही ते आता उघड होईल. मराठ्यांशी बेईमानी करणं त्यांना महाग पडणार आहे,” असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे. Manoj Jarange |
हेही वाचा:




