Manoj Jarange : हैदराबाद गॅझेटनुसार आजपासून प्रमाणपत्र देऊ; प्रसाद लाड यांचा मनोज जरांगे यांना शब्द
मराठा समाजाच्या सर्व मागण्या या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या म्हणजे 17 सप्टेंबरच्या आधी पूर्ण करून मराठ्यांना ओबीसींच्या सर्व सवलती देऊ, असा शब्द राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना दिला.

Manoj Jarange : मराठा समाजाच्या सर्व मागण्या या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या म्हणजे 17 सप्टेंबरच्या आधी पूर्ण करून मराठ्यांना ओबीसींच्या सर्व सवलती देऊ, असा शब्द राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना दिला. तसेच उद्या गुरुवारपासून हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्राचे वाटप सुरू होईल, असेही ते म्हणाले.
अंतरवाली सराटी येथे गेल्या पाच दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचे उपोषण सुरू आहे. हे आंदोलन सोडवण्यासाठी आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटी गाठून त्यांची भेट घेतली.
यावेळी प्रसाद लाड यांनी मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सरकारच्या वतीने सकारात्मक आश्वासन दिले असून, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या आधी सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, असा शब्द जरांगेंना दिला.
दरम्यान, प्रसाद लाड यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मनोज जरांगे (Manoj Jarange) पाणी प्यायले. परंतु, राज्य सरकारने आणखी चार दिवस घ्यावेत आणि मराठ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्यात असं जरांगे म्हणाले. आता जरी पाणी प्यायलो असलो तरी सगळ्या मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, असे ते म्हणाले.






