“माझी निष्ठा विकत घेता येत नाही म्हणून माझ्या कुटुंबावर हल्ला….” ; मनोज जरांगे यांचा दावा

Manoj Jarange । मराठा आरक्षणासाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच एक धक्कादायक दावा केलाय. मराठा आरक्षणाला जातीयवाडी असल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यावर भाष्य करताना जरांगेंनी गंभीर आरोप केलाय.
मराठा समाजावर करण्यात आलेल्या आरोपांवर बोलताना,“मराठा समाज जातीयवादी असता तर देवेंद्र फडणवीसही मुख्यमंत्री होऊ शकले नसते. मराठा समाज हा भाजपाच्या विरोधात कधीच नव्हता. मराठा समाजानेच तुम्हाला राजसत्तेवर बसवले. पण त्याच राजसत्तेवरून बसून गृहखात्याचा तुम्ही गैरवापर केला.. माझ्या कुटुंबियांवरही हल्ले करण्याचा डाव आखण्यात आला. ही पद्धत गृहमंत्र्यांना शोभणारी नाही. मी आणि माझे कुटुंब जरी दावावर लागले असले तरी मी सरकारला ऐकणारा नाही. सरकारला माझी निष्ठा विकत घेता येणार नाही.” म्हटले.
माझी निष्ठा विकत घेता येत नाही म्हणून हल्ल्याचा डाव Manoj Jarange ।
मी समाजासाठी प्रामाणिकपणे काम करत आहे. कोट्यवधी लोकांना आतापर्यंत आरक्षण मिळाले आहे. यापुढे मी धनगर, मुस्लीम यांच्या आरक्षणासाठी प्रयत्न करणार आहे. बारा बलुतेदारांचा वेगळा प्रवर्ग करण्याचा प्रयत्न आहे. या सगळ्या जाती एकत्र आल्या तर आपला सुपडा साफ होईल, अशी भीती काहींना वाटते. माझा प्रामाणिक विकत घेता येत नाही म्हणून माझ्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्याचा डाव आखला जात असल्याची माहिती मला मिळाली आहे, असा खळबळजनक दावा मनोज जरांगे यांनी केलाय.
गृहमंत्री फडणवीस हुकूमशहा Manoj Jarange ।
हा खळबळजनक दावा करत असताना मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी व्यक्त केली. “गृहमंत्र्यांचा माझ्यावर आणि माझ्या समाजावर रोष आहे. कारण मी त्यांचे ऐकत नाही. ते हुकूमशहा आहेत. त्यांना वाटतं ते म्हणतील तसंच व्हावं, नाहीतर ते तुरुंगात टाकतील. मी मागेही याबाबत बोललो होतो. माझ्याविरोधात एसआयटी स्थापन करणे, खोटे व्हिडीओ बनवणे, माझ्याविरोधात काही लोक मुंबईत नेऊन बसविणे, त्यांच्याकरवी आरोप करायला लावणे, असले प्रयोग करून झाले आहेत”, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा
‘निवडणूक भाजपने जिंकल्यास उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी तुरूंगात जातील..’ – अरविंद केजरीवाल





