Manoj Bajpayee : मनोज बाजपेयी साकारणार महात्मा गांधींची व्यक्तिरेखा; पहिली झलक समोर
Manoj Bajpayee : विविधांगी भूमिका साकारण्यासाठी ओळखले जाणारे मनोज बाजपेयी आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच महात्मा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Manoj Bajpayee : प्रसिद्ध अभिनेता मनोज बाजपेयी याच्या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. आता त्याच्या आगामी चित्रपटाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांच्या आगामी चित्रपटात मनोज बाजपेयी राष्ट्रपिता महात्मा गांधींची भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या चित्रपटातील अभिनेत्याचा फर्स्ट लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या आगामी चित्रपटाचे नाव अद्याप समोर आलेले नाही. एनएच स्टुडिओज या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. विविधांगी भूमिका साकारण्यासाठी ओळखले जाणारे मनोज बाजपेयी आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच महात्मा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहेत. (Manoj Bajpayee)
चित्रपटातील मनोज बाजपेयींचा पहिला लूक समोर आला आहे. या लूकमध्ये ते महात्मा गांधींच्या पेहरावात दिसत आहेत. या रूपातील फोटोमध्ये अभिनेत्याला ओळखणेही कठीण झालं आहे. त्यामुळे ही भूमिका अभिनेत्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक भूमिकांपैकी एक ठरणार आहे. (Manoj Bajpayee)
याआधी महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. मात्र, सुधीर मिश्रा यांच्या आगामी चित्रपटात नेमकं काय वेगळं पाहायला मिळणार, याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे. (Manoj Bajpayee)
चित्रपटाच्या कथेमागील कल्पनेबद्दल बोलताना दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांनी सांगितले की, हा चित्रपट इतिहासातील एका महत्त्वाच्या, मात्र फारशा ज्ञात नसलेल्या भागावर आधारित आहे. भारताच्या स्वातंत्र्यकाळातील २१ दिवसांचा एक अनोखा आणि कमी परिचित काळ या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे.
या चित्रपटात मनोज बाजपेयीसोबत अभिनेता सौरभ शुक्ला देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. महात्मा गांधींची भूमिका, स्वातंत्र्यकाळातील वेगळी कथा आणि दमदार कलाकारांची साथ यामुळे या चित्रपटाची उत्सुकता मनोज बाजपेयीचा लूक समोर आल्यानंतर शिगेला पोहचली आहे.





