Chinmay Mandlekar : “मनोज बाजपेयींनीच सुचवलं माझं नाव”; चिन्मयला अशी मिळाली गव्हर्नरच्या दिग्दर्शनाची संधी
Chinmay Mandlekar : मनोज बाजपेयी यांच्याविषयी बोलताना चिन्मयने त्यांचे भरभरून कौतुक केले.

Chinmay Mandlekar : प्रसिद्ध अभिनेते मनोज बाजपेयी अभिनीत ‘गव्हर्नर’ या चित्रपटाला समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असला, तरी तो बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकला नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे चिन्मय मांडलेकर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मनोज बाजपेयी यांच्यासोबतचा अनुभव आणि ‘गव्हर्नर’च्या दिग्दर्शनाची संधी त्यांना कशी मिळाली याबद्दल खुलासा केला.
एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत चिन्मय मांडलेकर म्हणाला, “प्रत्येक चित्रपट सगळ्यानांच आवडेलच असं नाही. काहींना ‘गव्हर्नर’ आवडला, तर काहींनी त्यावर टीकाही केली. हा चित्रपटसृष्टीचा एक भाग आहे.” (Chinmay Mandlekar)
मनोज बाजपेयी यांच्याविषयी बोलताना चिन्मयने त्यांचे भरभरून कौतुक केले. “मनोज बाजपेयी हे देशातील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी मला सलग दोनदा कामासाठी योग्य समजलं, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. त्यांच्या कामातील शिस्त, भूमिकेप्रती असलेली निष्ठा आणि व्यक्तिमत्त्वातून शिकण्यासारखं खूप काही आहे.”
हेही वाचा : Alia Bhatt : “आवडत नसेल तर माझे चित्रपट पाहू नका!”; घराणेशाहीच्या टीकेला आलिया भट्टने दिले होते सडेतोड उत्तर
यापूर्वी चिन्मयने दिग्दर्शित केलेल्या ‘इन्स्पेक्टर झंडे’मध्येही मनोज बाजपेयी यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. त्या चित्रपटात त्यांची निवड कशी झाली याबद्दल बोलताना चिन्मय म्हणाले, “जेव्हा उत्कृष्ट अभिनेत्यांचा विषय निघतो, तेव्हा मनोज बाजपेयी यांचं नाव अग्रस्थानी असतं. या भूमिकेसाठी तेच योग्य असल्याचं आम्हाला वाटलं आणि निर्माते तसेच नेटफ्लिक्सचंही त्यावर एकमत होतं.” (Chinmay Mandlekar)

Chinmay Mandlekar : “मनोज बाजपेयींनीच सुचवलं माझं नाव”; चिन्मयला अशी मिळाली गव्हर्नरच्या दिग्दर्शनाची संधी
‘गव्हर्नर’च्या दिग्दर्शनाची संधी मिळण्यामागेही मनोज बाजपेयी यांचाच मोठा वाटा असल्याचे चिन्मयने आवूर्जन सांगितले. “या चित्रपटाचं लेखन गेली तीन-चार वर्षे सुरू होतं. निर्माते विपुल अमृतलाल शाह यांच्याकडे हा प्रकल्प होता. त्या काळात मी ‘इन्स्पेक्टर झंडे’चं चित्रीकरण पूर्ण केलं होतं. मूळ दिग्दर्शकाला तारखांच्या अडचणीमुळे हा चित्रपट करता आला नाही. त्यानंतर नवीन दिग्दर्शकाच्या शोधात असताना मनोज सरांनीच माझं नाव विपुल सरांना सुचवलं. त्यांनी माझ्याबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिली आणि त्यातूनच मला ‘गव्हर्नर’ दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली.” (Chinmay Mandlekar)
दरम्यान, ‘गव्हर्नर’मधील मनोज बाजपेयी, अदा शर्मा आणि मधू यांच्या अभिनयाचे कौतुक होत असून, चित्रपटाला समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.





