Manoj Bajpayee : गोविंदाची जागा मनोज बाजपेयी घेणार? भागम भागच्या सिक्वलची घोषणा
Manoj Bajpayee : दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली असून, या चित्रपटात गोविंदाची जागा मनोज बाजपेयी घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Manoj Bajpayee : २००६ मध्ये भागम भाग हा कॅामेडी चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात अक्षय कुमार आणि गोविंदाच्या जोडीने प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन केले. आजही हा चित्रपट टेलिव्हिजनवर लागला तर प्रेक्षक तितक्याच आवडीने बघतात. आता तब्बल वीस वर्षांनतर या चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
काही माध्यमांच्या रिपोर्टनुसार, चित्रपटातील कास्टमध्ये मोठा बदल करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. अभिनेता गोविंदाच्या जागी अभिनेता मनोज बाजपेयीला घेतले जाणार असल्याचे समोर येत आहे.
पहिल्या भागात गोविंदाचा कॅामेडी सीन्स अफलातून होता. त्यामुळे दुसऱ्या भागात तो असणार हे निश्चित मानले जात असतानाच आता हा बदल समोर आल्याने चाहत्यांमध्ये हिरमोड झाल्याची भावना आहे. तूर्तास याबाबत अधिकृत अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
भागम भागमध्ये इतर कलाकारांनी देखील अफलातून अभिनय केला होता. पण हल्ली एखाद्या चित्रपटाचा सीक्वल येणार असल्याचे जाहीर केल्यानंतर त्यातील कास्टमध्ये काही प्रमाणात बदल केले जातात. असे बहुतांशी वेळा घडत आहे. याबाबत अशीही माहिती आहे की कलाकारांच्या तारखांचा अडथळा किंवा मग इतर कारणांमुळे चित्रपटात आधीच्या चित्रपटातील कलाकार दिसत नाहीत.
दरम्यान, राज शांडिल्य दिग्दर्शित ‘भागम भाग २’च्या निर्मात्यांनी दावा केला की, चित्रपटातील कलाकार हे बदलू शकतात. तसेच चित्रपटाची तीच कथा असेल गैरसमज, ओळखीची अदलाबदल आणि वेगाने वाढणारा गोंधळ. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना तोच अनुभव चित्रपटगृहांमध्ये मिळणार आहे.
या चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्याबरोबर मीनाक्षी चौधरी दिसणार आहे. पण मग मनोज बाजपेयी असल्यास तो अक्षय कुमारबरोबर काय धमाल करेल, याचे उत्तर मिळण्यासाठी प्रेक्षकांना वाट पहावी लागणार आहे.





