मनोज बाजपेयीच्या हॉरर कॉमेडी सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता; राम गोपाल वर्मासोबत पुन्हा करणार काम

Manoj Bajpayee | मनोज बाजपेयी यांच्या एका हॉरार कॉमेडी चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. ‘पुलिस स्टेशन में भूत’ असे या चित्रपटाचे नाव आहे. विशेष म्हणजे 27 वर्षांपूर्वी ‘सत्या’ सारखा चित्रपट देणारे राम गोपाल वर्मा आणि मनोज बाजपेयी पुन्हा एकदा या चित्रपटानिमित्त एकत्र दिसणार आहेत.
या चित्रपटात मनोज यांच्यासोबत जेनेलिया डिसूजा देखील दिसणार आहे. चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले असून पहिले शेड्यूल पूर्ण झाले आहे. या चित्रपटाची कथा काहीशी वेगळी आहे. जेव्हा आपण घाबरतो तेव्हा पोलिस स्टेशनकडे जातो, पण जेव्हा पोलिसच घाबरतात तेव्हा ते कुठे जातील? हाच या चित्रपटाचा ट्विस्ट आहे. Manoj Bajpayee |
SHOOT BEGINS 🎬
From Satya to now… some journeys are meant to come full circle. Thrilled to reunite with @RGVzoomIn after nearly three decades for our new horror comedy Police Station Mein Bhoot. This one is special.@geneliad @VauveEmirates… pic.twitter.com/a6rtwZuor1
— manoj bajpayee (@BajpayeeManoj) September 1, 2025
राम गोपाल वर्मा म्हणाले, “मनोजसोबत पुन्हा काम करणे माझ्यासाठी खूप खास आहे. भीती तेव्हा सर्वात भयानक होते जेव्हा ती सुरक्षेच्या प्रतीकाला आव्हान देते. मनोजची अभिनयशैली आणि जेनेलियाची निरागसता या कथेला आणखी प्रभावी बनवेल.” मनोज बाजपेयीने राम गोपाल वर्मा दिग्दर्शित तीन चित्रपटांत काम केले आहे. ‘सत्या’ व्यतिरिक्त कौन आणि ‘सरकार 3’ यांचा समावेश होतो. Manoj Bajpayee |
मनोज बाजपेयी अलिकडेच ‘इन्स्पेक्टर झेंडे’ या चित्रपटात दिसले होते. आता ‘पुलिस स्टेशन में भूत’ या चित्रपटात ते दिसणार आहे. मात्र, या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. परंतु यावर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
हेही वाचा:





