Mann Ki Baat 100 : आमिर खान म्हणतोय… ‘मन की बात ऐतिहासिक ठरले’, मोदींचे केले खास कौतुक

नवी दिल्ली – ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांशी संवाद साधत असतात. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा कार्यक्रम घेतला जातो. या कार्यक्रमातून देशभरातून नागरिक सहभाग नोंदवित असतात. ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या 100 व्या भागाचे उद्या म्हणेजच, 30 एप्रिल रोजी देशभर प्रसारण होणार आहे. या कार्यक्रमाला सर्व केंद्रीय मंत्री, वरिष्ठ नेते, खासदार, आमदार व नेत्यांना उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, नुकतंच ‘मन की बात @100’ कॉन्क्लेवमध्ये बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट ‘आमिर खान’ सहभागी झाला होता. याविषयीचा आमिर खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आमिर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना दिसत आहे.
आमिर खानने पीएम नरेंद्र मोदी यांच्या ऑल इंडिया रेडिओवर प्रसारित होणारा कार्यक्रम ‘मन की बात’चे कौतुक केले. यावेळी अमित म्हणाला की, “मन की बात’ने भारतवासींवर खोल प्रभाव टाकला आहे. हे एक एतिहासिक ठरले आहे, ज्याची सुरुवात आमच्या पंतप्रधानांनी केली आहे’. असं तो म्हणाला.
दरम्यान, या व्हिडिओमध्ये आमिर खानसोबत बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडनदेखील दिसतेय. ‘मन की बात @100’ मध्ये राजकीय नेते, क्रीडा आणि संगीत जगतातील लोकदेखील सहभागी झाले होते.
100 रुपयांचे विशेष नाणे जारी केले जाणार….
‘मन की बात’चे 100 भाग पूर्ण झाल्यावर 100 रुपयांचे नाणे जारी केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाचा हा 100 वा भाग या महिन्याच्या शेवटच्या रविवारी म्हणजेच 30 एप्रिल रोजी प्रसारित होणार आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मन की बात चे 100 भाग पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 100 रुपयांचे विशेष नाणेही जारी करणार आहेत. तसेच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून एक विशेष टपाल तिकीट जारी करण्यात येणार आहे.





