Manmohan Singh Death : अर्थव्यवस्थेला संजीवनी देणारे महर्षी हरपले ! मनमोहन सिंग यांची कारकीर्द…

Manmohan Singh Death : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी (26 डिसेंबर 2024) निधन झाले. वयाच्या 92व्या वर्षी दिल्ली एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे आज गुरुवारी सायंकाळी दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.
डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी अविभक्त भारतातील पंजाब प्रांतातील एका गावात झाला. 1948 मध्ये पंजाब विद्यापीठातून त्यांनी दहावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठातून घेतले. 1957 मध्ये त्यांनी अर्थशास्त्रात प्रथम श्रेणीने पदवी प्राप्त केली. त्यानंतर 1962 मध्ये त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नूफिल्ड कॉलेजमधून अर्थशास्त्रात डी.फिल केले. डॉ. मनमोहन सिंग आणि त्यांच्या पत्नी श्रीमती गुरशरण कौर यांना तीन मुली आहेत.
भारताचे चौदावे पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंग हे त्यांच्या नम्रता, कठोर परिश्रम आणि कामाप्रती बांधिलकी यासाठी ओळखले जातात. मनमोहन सिंग 1971 मध्ये वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून रुजू झाले. 1972 मध्ये त्यांची अर्थ मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली.
1972 मध्ये त्यांची अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. यानंतर त्यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) अध्यक्ष अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं.
अर्थमंत्री म्हणूनही योगदान :
मनमोहन सिंग 1991 ते 1996 पर्यंत भारताचे अर्थमंत्री होते. या काळात त्यांनी आर्थिक सुधारणांचे व्यापक धोरण राबवले, ज्याचे जगभरात कौतुक झाले. या सुधारणांनी भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढले आणि नवी दिशा दिली. डॉ.मनमोहन सिंग 1991 मध्ये पहिल्यांदा राज्यसभेचे सदस्य झाले.
त्यांनी पाच वेळा आसामचे प्रतिनिधित्व केले आणि 2019 मध्ये राजस्थानमधून राज्यसभा सदस्य झाले. 1998 ते 2004 पर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदी डॉ. त्यांनी 1999 मध्ये दक्षिण दिल्लीतून लोकसभा निवडणूकही लढवली होती, पण त्यांना यश आले नाही.
दोन वेळा पंतप्रधानपद :
2004 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर, 22 मे रोजी त्यांना भारताचे पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आलं. 2009 मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि 2014 पर्यंत ते या पदावर राहिले.
मनमोहन सिंग यांची कारकीर्द :
1957 ते 1965- चंदीगडमधील पंजाब विद्यापिठ प्राध्यापक.
1969 -1971- दिल्ली स्कूल ऑफ इकाॅनॉमिक्स या संस्थेत आन्तरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक.
1976 – दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात मानद प्राध्यापक.
1982 ते 1985 – भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर.
1985 ते 1987 – भारताचा योजना आयोगाचे उपाध्यक्ष.
1990 ते 1991 – भारतीय पन्तप्रधानाचे आर्थिक सल्लागार.
1991 – नरसिंह राव यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारमध्ये अर्थमंत्री.
1991 – आसाममधून राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडले गेले.
1995 – दुसऱ्या वेळी राज्यसभा सदस्य
1996 – दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मानद प्राध्यापक
1999 – दक्षिण दिल्लीमधून लोकसभा निवडणूक लढले पण पराभव झाला
2001 – तिसऱ्या वेळी राज्यसभा सदस्य आणि विरोधी पक्ष नेता
2004 – भारताचे पंतप्रधान
2009 – दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ





