मनीष सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडीत 5 फेब्रुवारीपर्यंत वाढ

नवी दिल्ली – कथित दारू घोटाळा प्रकरणात आपचे नेते मनीष सिसोदिया यांना न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत ५ फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी मनीष सिसोदिया यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
या सुनावणीसाठी सिसोदिया यांना राऊस एव्हेन्यू न्यायालयात हजर केले जाणार होते. परंतु ते ऑनलाइन हजर झाले. अशा परिस्थितीत त्यांना वैयक्तिकरित्या हजर का करण्यात आले नाही, अशी विचारणा न्यायालयाने तिहार तुरुंग अधिकाऱ्यांना केली.
न्यायाधीशांनी संताप व्यक्त करत म्हटले की, तुरुंग प्रशासनाकडून कोणताही ई-मेल आला नाही. ज्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्याची परवानगी मागितली गेली.
तिहार तुरुंग प्रशासनाला पुढील तारखेला मनीष सिसोदिया यांना हजर करण्यास सांगितले. दरम्यान, मनीष सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी शुक्रवार, १९ जानेवारी रोजी संपत असल्याने न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांच्या न्यायालयीन कोठडीत ५ फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे.





