मेलेनिया गिरवणार आनंदी तासाचा धडा

नवी दिल्ली : प्रथम अमेरिकन महिला मेलेनिया ट्रम्प या दिल्लीच्या सरकारी शांळातील आनंदी तासाला भेट देणार आहेत. त्याची तयारी पूर्णत्वाला आली आहे, अशी माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.
मात्र ट्रम्प भेट देणार असल्याच्या शाळेचे नाव आणि स्थान सांगण्यास त्यांनी नकार दिला. पाहुण्याच्या सुरक्षितेतच्या दृष्टीकोनातून ही गोपनियता आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकार आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सुचनेनुसार सर्व तयारी पूर्ण होत आली आहे. मेलेनिया ट्रम्प यांच्या स्वागतासाठी काही तयारी पूर्ण होत आली आहे. पण सुरक्षिततेच्या कारणास्तव आम्ही त्याची माहिती तुम्हाला देऊ शकत नाही, असे सिसोदिया म्हणाले.
अमेरिकेच्या प्रथम महिला या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमवेत सोमवारी भारत भेटीवर येत आहेत. त्यांना भारतीय संस्कृतीचे वास्तव दर्शन घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दिल्लीच्या शाळांतील आनंदी तास
आम आदमी पक्षाने आनंदी तास 2018 मध्ये सुरू केला. मेडिटेशन, पथनाट्ये, मुलभूत शिस्त आदींचे शिक्षण यात देण्यात येते. चिंता दूर करून विद्यार्थ्यांच्या मनावरील तणाव कमी करण्यासाठी हे पाऊल जाणीवपुर्वक उचलण्यात आले. त्याचे उत्तम परिणाम दिसून आले आहेत.





