Manikrao Kokate : कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी; माणिकराव कोकाटे पुन्हा बरळले

छत्रपती संभाजीनगर : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुकतेच शेतक-यांबाबत वादग्रस्त विधान केले होते. हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का?, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. हे वक्तव्य ताजे असतानाच माणिकराव कोकाटे आज पुन्हा बरळले आहेत. स्वत:च्या मंत्रिपदाबाबत त्यांनी हे विधान केले. कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी, असे ते म्हणाले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत प्रगतिशील आणि प्रयोगशील शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये बोलताना माणिकराव कोकाटे यांनी स्वत:च्या मंत्रिपदाबाबत वादग्रस्त विधान केले. या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
माणिकराव कोकाटे म्हणाले, कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी. अजितदादांनी मला हे मंत्रिपद दिले. माणिकराव कोकाटे यांनी कृषी खात्याची महती गाताना ओसाड गावच्या पाटीलकीचा उल्लेख केला. या वक्तव्याच्या माध्यमातून त्यांनी कृषी खात्याबाबतची नाराजी व्यक्त केली. या वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडले आहेत.





