मनसेची नाशिक मध्ये पडझड सुरूच
Updated On:

नाशिक: शिवसेनेतून मनसेत आलेल्या नगरसेवक दिलीप दातीर यांना उमेदवारी दिल्याने नाशिक चे मनसे शहराध्यक्ष अनिल मटाले यांनी पक्षाच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाची नवीन बांधणी करणाऱ्या राज ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 
गेल्या काही वर्षात भाजप आणि शिवसेनेने मनसेला नाशिक मध्ये खिंडार पडले होते. पक्षाचा एक एक मोहरा गालात असताना मटाले यांनी हिमतीने खिंड लढवली होती. मात्र त्यांनीही आता पक्षाला जय महाराष्ट्र केल्याने खळबळ उडाली आहे.





