Ganesh Festival 2024: ‘मंडळाने गणपती उत्सवादरम्यान नियमांचे पालन करावे अन्यथा…’; वाघोली पोलिसांचा थेट इशारा

Wagholi । ganesh festival 2024 : पुणे शहरात गणपती उत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सर्व गणपती मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाधिकारी व प्रशासन यांच्यात नुकतीच बैठक झाली.
त्यामध्ये पोलीस प्रशासनाकडून परिसरातील दीडशे नोंदणीकृत मंडळांना काही सूचना देण्यात आल्या असून, त्या मंडळांनी पाळाव्यात मंडळांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
वाघोली मधील कार्यालयात लोणीकंद पोलीस आणि गणपती मंडळांची बैठक झाली. यावेळी परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त आयुक्त हिम्मत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रोजितवाड, वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव व महावितरणचे दीपक बाबर, वाघोली व लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पोलीस उपायुक्त आयुक्त हिम्मत जाधव यांनी मंडळांना सूचना करताना सांगितले की, मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी नियमाचे पालन करा. एक्का, बादशहा, दादा, आबा, कोणी करू नये त्यांना त्यांची जागा दाखवण्यात येईल.
लेझर लाइटिंगवर पूर्णपणे बंद राहील तर डीजे चा मोठा आवाज चालणार नाही, आपल्या कुटुंबियांची डीजेसाठी परवानगी घेऊन या नंतरच आम्ही परवानगी देऊ.
मंडळातील कार्यकर्ते मद्य व अन्य नशाजन्य पदार्थ सेवन करू नये. मंडळाच्या शेडमध्ये २४ तास स्वयंसेवक असावेत तसेच प्रत्येक मंडळाने परिसरामध्ये सीसीटीव्ही लावावे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना होणार नाही. विसर्जन मिरवणुकीत जे वाहन वापरात येईल त्या वाहनाचे कागदपत्र पूर्ण असावीत.
त्याचबरोबर चालकावरही लक्ष ठेवावे जे नियमांचे पालन करतील त्यांच्या सन्मान ही केला जाईल आणि जे नियम मोडतील त्यांच्या कायदेशीर कारवाई करण्यात येईल. गोकुळाष्टमी दहीहंडी आणि गणेशोत्सव सर्वांनी मोठ्या उत्साहात साजरे करावे.
उत्सव साजरे करताना कोणत्याही नियमाचे उल्लंघन होऊन आपल्यामुळे इतर व्यक्ती त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. दुकानदाराला जबरदस्तीने वर्गणी मागणाऱ्या वर देखील गुन्हे दाखल करण्यात येतील याची अध्यक्ष कार्यकर्ते तसेच मंडळांनी दक्षता घ्यावी.




