मंचर- येथील प्रतिबंधित क्षेत्रात दुकाने उघडी ठेवून शासन नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन दुकानदारांविरोधात मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मंचर शहर व परिसरात कुणीही बाहेर पडू नये किंवा बाहेर कोणीही गावात येऊन संचारबंदीचे उल्लंघन करू नये, गर्दी जमवू नये, असे आदेश असतानाही पिंपळगांव रस्त्यावरील एस. कॉर्नर येथे रमीझखान दिलदारखान पठाण (वय 28) यांनी त्यांचे चिकनचे आणि मंचर शहरातील डोबीमळा येथे सविता चंद्रशेखर कानसकर (वय 39) यांनी आणि किशोर कैलास राक्षे यांनी त्यांची दुकाने उघडली होती.